-
नवी मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता चिघळला असून आज स्थानिकांनी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करत सिडकोच्या कार्यालयावर धडक मोर्चा कढण्याचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये कृती समितीने शेकडो बॅनर्स लावलेले. (सर्व फोटो : नरेंद्र वास्कर)
-
पोलिसांनी आज सकाळीच हे बॅनर्स आणि पोस्टर्स हटवले आहेत. शेकडो झेंडेही ताब्यात घेतलेत.
-
महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे बॅनर्स हटवण्यात आलेत.
-
नवी मुंबई विमानतळाला राज्य सरकारने शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची तयारी सुरु केली असून त्याविरोधात स्थानिक एकवटले आहेत.
-
या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी स्थानिकांची मागणी असून त्यासाठी आज सिड़कोच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे.
-
याच पार्श्वभूमीवर संपूर्ण नवी मुंबईमध्ये जागोजागी पोस्टर्स लावण्यात आलेत.
-
या पोस्टर्सवर दि. बा. पाटलांनीच स्थानिकांना खरा वाघ बनवल्याचं सांगत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
-
मात्र पोलिसांनी हे असे शेकडो बॅनर्स आज सकाळपासूनच काढून टाकण्यास सुरुवात केली.
-
बॅनर्स आणि होर्डींग नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढण्यात आले.
-
पोलिसांच्या देखरेखीखाली हे बॅनर्स टॅम्पोमधून दुसरीकडे हलवण्यात आले.
-
आज नवी मुंबईमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
-
लाकडाच्या ढाली, हेल्मेट, काठ्या अशा सर्व साहित्यासहीत पोलीस या ठिकणी तैनात आहेत.
-
महिला पोलीसांनाही मोठ्याप्रमाणात तैनात करण्यात आलंय.
-
महिला पोलिसांना कालच बेलापूर पोलीस ग्राऊण्डवर यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या.
-
बुधवारी पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांची ड्युटी कुठे लावण्यात आलीय यासंदर्भातील माहिती देण्यात आली.
Photos: आंदोलनाआधीच दि. बा. पाटील समर्थकांनी लावलेले शेकडो बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे पोलिसांनी हटवले
पोलिसांनी आज सकाळीच हे बॅनर्स आणि पोस्टर्स हटवले आहेत. शेकडो झेंडेही ताब्यात घेतलेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
Web Title: Navi mumbai airport name d b patil protest at cidco office officer collect banner flags scsg