-
धार्मिक स्थळे दाखवत पर्यटन वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न, रेल्वेने सुरु केली आहे ‘श्री रामायण ट्रेन’
-
१७ दिवसात ७५०० किलोमीटरचा प्रवास करत देशातील ११ प्रमुख ठिकाणांना भेट देणार, आयआरसीटीसी ( IRCTC ) मार्फत याचे बुकिंग करता येणार
-
अयोध्या, नंदीग्राम, वाराणसी, प्रयागराज, जनकपूर, सीतामढी, हम्पी, रामेश्वर, श्रृंगवेरपुर, चित्रकूट, नाशिक इथे भेट देता येणार
-
ही ट्रेन पुर्णपणे वातानुकूलीत आहे. प्रथम श्रेणीचे तिकीट एक लाख २ हजार ९५ रुपये. तर द्वितीय श्रेणीचे तिकीट ८२ हजार ९५० रुपये एवढे आहे
-
संपुर्ण रेल्वेचा प्रवास, प्रवासादरम्यानचे जेवण-न्याहारी, नियोजीत ठिकाणी पोहोचण्यासाठी वातानुकूलित बस, राहण्यासाठी वातानुकूलित हॉटेल व्यवस्था अशा सर्व सुविधा या तिकीट दरांतच मिळणार आहे
-
‘श्री रामायण य़ात्रा ट्रेन’ मधील अंतर्गत सुविधा अत्यंत आकर्षक ठेवण्यात आली आहे. लायब्ररीची सुविधा देखील आहे. ट्रेनमध्ये सीसीटीव्हीसह सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत
रेल्वेने सुरु केली आहे ‘श्री रामायण यात्रा ट्रेन’, रामाशी संबंधित देशातील प्रमुख ठिकाणांना रेल्वेने भेट देता येणार
Web Title: Indian railway started shri ramayana yatra train going to visit places related to ram in country asj