-

समीर दाऊद वानखेडे यांनी आईच्या मृत्यूनंतरही फर्जीवाडा केला असल्याचा आणखी एक गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
-
समीर दाऊद वानखेडे यांनी १६ एप्रिल २०१५ रोजी आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम महिला असे प्रमाणपत्र घेऊन ओशिवरा मुस्लिम कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले आणि लगेच दुसर्या दिवशी १७ एप्रिल २०१५ रोजी मुंबई मनपाकडून हिंदू नावाचा मृत्यूदाखला घेतला असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
-
कुटुंब मुस्लिम असताना दुहेरी ओळख कशी दाखवत आहेत? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
-
फर्जीवाडा करुन अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळवली आणि आता परिवार मुस्लिम असतानाही आईच्या मृत्यूचा दाखला मनपाकडून हिंदू म्हणून घेतला आहे. दोन पद्धतीची ओळख वानखेडे कुटुंब कसे ठेवत आहे? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
-
याआधी नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडे यांच्या आई झहेदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मृत्यूचे दाखले शेअर केले होते. १६ एप्रिल २०१५ रोजी झहेदा यांचं निधन झाल्याचा उल्लेख या दाखल्यात आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी यावेळी या दोन्ही दाखल्यांवर उल्लेख असलेल्या धर्माकडे लक्ष वेधलं. एका दाखल्यावर मुस्लिम असा उल्लेख असून दुसऱ्या दाखल्यात हिंदू असा उल्लेख आहे.
-
“अजून एक फर्जीवाड़ा. अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहेत ज्ञानदेव वानखेडे,” असं नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
-
आम्ही जे दाखले ट्वीट करत आहे ते दाखले मनपाकडून अधिकृत घेऊनच करत असल्याचे पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
-
६ ऑक्टोबरपासून समीर दाऊद वानखेडे यांचे अनेक फर्जीवाडे उघड करण्याचे काम सुरू केले आहे. ५० दिवसात आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कसे अपहरण करण्यात आले. २५ कोटींची डील १८ कोटींवर झाली हे उघड झाले आहे. जन्माच्या दाखल्यात, शाळेच्या दाखल्यात फेरफार केले. बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली. अल्पवयीन असताना ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडेंच्या नावाने परमिट रुमचे लायसन्स घेतले. आम्ही हे सर्व समोर आणले आहे असं यावेळी नवाब मलिक यांनी सांगितलं.
-
एखादा व्यक्ती धर्मपरिवर्तन करत असेल तर त्याचे गॅझेट करुन जाहीर करायचे असते. मात्र तसे करण्यात आले नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
-
(All: File Photos)
मुस्लिम महिला असल्याचं प्रमाणपत्र घेऊन आईवर अंत्यसंस्कार अन् त्यानंतर…; नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर आरोप
वानखेडे कुटुंबाने दोन ओळखी ठेवल्या आहेत; आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम दाखला घेतला; समीर वानखेडेंवर आरोप
Web Title: Ncp nawab malik press conference ncb sameer wankhede mother death certifcate sgy