• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. cds bipin rawat death chopper helicopter crash delhi sulur flight sgy

CDS Bipin Rawat: दिल्लीतून उड्डाण घेण्यापासून ते हेलिकॉप्टर दुर्घटना होईपर्यंत…जाणून घ्या शेवटच्या एका तासात नेमकं काय झालं?

तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला

December 9, 2021 10:08 IST
Follow Us
  • तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    1/17

    तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 2/17

    जनरल बिपीन रावत हे ‘एमआय-१७ व्ही५’ हेलिकॉप्टरने तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील (डीएसएससी) कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १४ जण होते.

  • 3/17

    बिपीन रावत सकाळी नऊ वाजता विशेष विमानाने पत्नीसोबत दिल्लीहून तामिळनाडूसाठी रवाना झाले होते. ११.३५ ला सुलूर हवाई तळावर त्यांचं आगमन झालं. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई तळावरून सकाळी ११.४८ वाजता उड्डाण घेतलेले हे हेलिकॉप्टर पाऊण तासात वेलिंग्टन येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच (१२.२२ वाजता) ते निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी-नांचपंचथ्राम येथे कोसळले.

  • 4/17

    हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नेमकं काय झालं हे जाणून घेऊयात –
    १ वाजून १७ मिनिटं – कुन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आली. बिपिन रावत याच हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. तिघांची यावेळी बचावकार्यादरम्यान वाचवण्यात आलं.

  • 5/17

    १ वाजून ४८ मिनिटं – हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणी वायूदलाने चौकशीचे आदेश दिले.

  • 6/17

    २ वाजून ११ मिनिटं – दुर्घटनास्थळी चार मृतदेह सापडले होते. तिघांना आधीच वाचवण्यात आलं होतं

  • 7/17

    २ वाजून २४ मिनिटं – संसदेत राजनाथ सिंग निवेदन देणार असं वृत्त आलं.

  • 8/17

    २ वाजून ५६ मिनिटं – तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना वैद्यकीय मदत करण्याचा आदेश दिला.

  • 9/17

    २ वाजून ५७ मिनिटं – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग कुन्नूर येथे जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं.

  • 10/17

    ३ वाजून ८ मिनिटं – ११ मृतदेह ताब्यात घेण्यात आले

  • 11/17

    ३ वाजून १८ मिनिटं – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग संसदेत माहिती देणार असल्याची चर्चा असतानाच ते बिपिन रावत यांच्या घरी पोहोचले.

  • 12/17

    ४ वाजून ४३ मिनिटं – लष्करप्रमुख जनरल नरवणे बिपिन रावत यांच्या घरी पोहोचले

  • 13/17

    ४ वाजून ५३ मिनिटं – हेलिकॉप्टर दुर्घटनेत १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. डीएनए चाचणी करुन मृतदेहांची ओळख पटवली जाईल असं सांगण्यात आलं.

  • 14/17

    ५ वाजून ७ मिनिटं – पंतप्रधानांच्या निवासस्थानी सीसीएसची बैठक बोलावण्यात आली.

  • 15/17

    ६ वाजून ७ मिनिटं – बिपिन रावत यांचं निधन झाल्याचं वृत्त आलं. वायूदलाने याला दुजोरा दिला.

  • 16/17

    ६ वाजून ४६ मिनिटं – राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

  • 17/17

    ७ वाजून ३ मिनिटं – बिपिन रावत तसंच इतर पार्थिव उद्या संध्याकाळपर्यंत दिल्लीत पोहोचतील अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Cds bipin rawat death chopper helicopter crash delhi sulur flight sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.