-
पंजाबमध्ये इतर सर्व पक्षांचा सुपडा साफ करत आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळवले
-
दिल्लीमधील सलग दोन विधानसभा निवडणुकीतील यशानंतर पंजाबच्या रुपाने पहिल्यांदाच एका मोठ्या राज्यात आम आदमी पार्टीने सत्ता मिळवली
-
आता गुजरातकडे ‘आप’ने लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे, आपचे दोन मुख्यमंत्री केजरीवाल आणि भगवंत मान हे गुजरातमध्ये दाखल झाले आहेत
-
मुख्यमंत्री केजरीवाल आणि भगवंत मान यांनी साबरमती आश्रमाला दिली भेट
-
दिल्ली आणि पंजाबच्या तुलनेत गुजरातमध्ये ‘आप’ची संघटना म्हणावी तेवढी मजबूत नाही, दोन दिवसांच्या दौऱ्यात संघटना बांधणीबाबत बैठका घेतल्या जाणार आहेत
-
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने १८२ पैकी फक्त ३० जागांवर निवडणुक लढवली होती, दोन जागा वगळात सर्व ठिकाणी अनामत रक्क्म जप्त झाली होती
-
गुजरातमध्ये आजही भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत, तेव्हा संघटना बांधणीचे मोठे आव्हान ‘आप’ समोर आहे
Photos : आम आदमी पार्टीचे ‘मिशन गुजरात’ सुरु, अरविंद केजरीवाल – भगवंत मान गुजरात दौऱ्यावर
पंजाबमधील विजयानंतर ‘आम आदमी पार्टी’च्या मुख्यमंत्र्यांचा गुजरात दौरा, डिसेंबरमध्ये आहेत गुजरात विधानसभा निवडणुका
Web Title: Aam admi party mission gujrat begin arvind kejriwal bhagwant mann on gujrat tour asj