• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. beautiful photos of mahabaleshwar panchgani tourist place pbs

Photos : महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांच्या गर्दीने फुलले, पाहा काही खास क्षणचित्रे…

Updated: April 16, 2022 23:46 IST
Follow Us
  • सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले. दिवसभर विविध पॉईंट्सवर आणि बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी झाली. सध्या एकूणच महाबळेश्वरला जत्रेचे स्वरूप आले. (संग्रहित छायाचित्र)
    1/9

    सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले. दिवसभर विविध पॉईंट्सवर आणि बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी झाली. सध्या एकूणच महाबळेश्वरला जत्रेचे स्वरूप आले. (संग्रहित छायाचित्र)

  • 2/9

    या आठवड्यातील सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर एकदम हाऊसफुल्ल झाले. वाहनांच्या गर्दीने वाहतुकीची कोंडी झाल्याने पर्यटक वाहतूक कोंडीत अडकून पडले. मात्र, वाहतूक नियंत्रण होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

  • 3/9

    करोनाचे सगळे निर्बंध उठल्यामुळे महाबळेश्‍वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या मोठ्या गर्दीने गजबजून गेली. सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी येथील विल्सन पॉईंट, संध्याकाळी सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी येथील मुंबई पॉईंटवर पर्यटकांची एकच गर्दी उसळली.

  • 4/9

    पर्यटक दिवसभर विविध पॉईंट्सची सफर करत आहेत. येथील अनोख्या व विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.

  • 5/9

    महाबळेश्वर येथील वेण्णा लेकवर नौकाविहार, लालचुटूक स्ट्रॉबेरी, गाजर, त्यांच्या जोडीला मक्याचे कणीस, मक्याचे पॅटीस यावर पर्यटक येथेच्छ ताव मारत आहेत.

  • 6/9

    लेकच्या चौपाटीवर भेळ पुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, पॅटीस खाण्यासाठी पर्यटकांची पावले हातगाडीकडे वळत आहेत. या ठिकाणी अनेक पर्यटक घोडेस्वारी चाही आनंद लुटत आहेत.

  • 7/9

    पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे महाबळेश्वरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी ही झाल्याचं पाहायला मिळालं.

  • 8/9

    पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीने दोन किलोमीटर अंतरात वाहनांच्या दिवसभर लागला रांगा लागल्याचे दिसून आले. त्याचबरोबर आर्थर सीट, मुंबई, केटस पॉइंट या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीत पर्यटक मोठ्या संख्येने अडकलेले दिसले.

  • 9/9

    सलग सुट्ट्यांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होणार याची माहिती असूनही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कोणतेही नियोजन पोलिसांकडून झाले नसल्याने पर्यटकांनी संतापही व्यक्त केला.

TOPICS
पर्यटनTourismमहाराष्ट्र पर्यटनMaharashtra Tourism

Web Title: Beautiful photos of mahabaleshwar panchgani tourist place pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.