-
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर मोदींचा हा दुसरा गुजरात दौरा आहे. (फोटो सौजन्य-एएनआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेरावल शहरात सभेला संबोधित केले. भाजपाला विजयी करण्याचे आवाहन गीर सोमनाथ जिल्ह्यातील मतदारांना मोदींनी केले.(फोटो सौजन्य-एएनआय)
-
गीर सोमनाथ जिल्ह्यातून भाजपाचे चार उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथ मंदिरात दर्शन घेतले. (फोटो सौजन्य-पीएमओ)
-
‘भारत जोडो’ यात्रेत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीवरुन धोराजी येथील सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली. “नर्मदा धरणाचा प्रकल्प तीन दशके रखडवणाऱ्या महिलेसोबत काँग्रेस नेते पदयात्रा काढताना दिसले”, असं म्हणत मोदींनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला.(फोटो सौजन्य-एएनआय)
-
भाजपाकडून पक्षातील बंडखोरांवर कारवाई केली जात आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सात जणांना निलंबित करण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य-पीएमओ)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिरात अभिषेक केला.(फोटो सौजन्य-पीएमओ)
-
गुजरातच्या वलसाडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रोड शो’ केला.(फोटो सौजन्य-भाजपा ट्विटर)
-
भाजपाच्या या ‘रोड शो’ला नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य-भाजपा ट्विटर)
-
वेजलपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अमित ठाकर यांचा प्रचार करताना समर्थक. (फोटो-निर्मल हरिंद्रन-एक्स्प्रेस)
-
मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह यांच्या घाटलोडिया मतदारसंघात कार्यकर्त्याकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.(फोटो-निर्मल हरिंद्रन-एक्स्प्रेस)
-
गुजरात दंगलीतील दोषीच्या मुलीला तिकीट दिल्यानं भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. पायल कुकरानी या नरोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
-
गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदार आपला हक्क बजावतील.
PHOTOS: गुजरातचा गड राखण्यासाठी पंतप्रधान मोदींचा झंझावाती प्रचार, सोमनाथ मंदिरात विजयासाठी घातलं साकडं
भाजपाकडून पक्षातील बंडखोरांवर कारवाई केली जात आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सात जणांना निलंबित करण्यात आलं आहे
Web Title: Gujarat assembly election 2022 prime minister narendra modi did election campaigning in gir somnath walsad veraval town hd import rvs