-
पुणे : शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारतासाठी आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य शुक्रवारी दाखविण्यात आला.
-
पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला.
-
श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते.
-
त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार.
-
शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे.
-
शुक्रवारी मंदिरात पूजा, गणेशयाग आणि अभिषेक झाला.
-
गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची आणि कल्पवृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती.
-
मंदिरात पहाटे डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर, आणि रागिणी शंकर यांचा व्हायोलिन सहवादनाचा कार्यक्रम झाला.
-
पुष्टीपती विनायक अवताराचा संदर्भ श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये आढळतो.
-
या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात.
-
दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला असतो. त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात.
-
वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता.
-
भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो.
-
ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
Photos: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य
पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
Web Title: Vaishakh purnima pushtipati vinayak jayanti shreemant dagadusheth halwai ganapati pune shahale mahotsav 2023 vvk 10 sdn