• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. odisha train derailed live updates possible signalling error may have caused odisha train tragedy sgk

…म्हणून तीन ट्रेन एकमेकांना धडकल्या, संयुक्त चौकशी समितीच्या अहवालातून कारण आले समोर

Updated: June 3, 2023 16:05 IST
Follow Us
  • ओडिशामध्ये घडलेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, ९०० हून अधिक प्रवासी जखमी आहेत. याप्रकरणी जगभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. गेल्या दोन दशकतील हा सर्वाधिक भीषण अपघात असल्याचंही म्हटलं जातंय. या सर्व पार्श्वभूमीवर हा अपघात नेमका कसा घडला याबाबत सर्वांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रथमदर्शनी सिग्नल यंत्रणेतील चुकीमुळे हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. (फोटो - इंडियन एक्स्प्रेस)
    1/9

    ओडिशामध्ये घडलेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, ९०० हून अधिक प्रवासी जखमी आहेत. याप्रकरणी जगभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. गेल्या दोन दशकतील हा सर्वाधिक भीषण अपघात असल्याचंही म्हटलं जातंय. या सर्व पार्श्वभूमीवर हा अपघात नेमका कसा घडला याबाबत सर्वांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रथमदर्शनी सिग्नल यंत्रणेतील चुकीमुळे हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/9

    निरिक्षकांनी केलेल्या संयुक्त तपासणीमधून सिग्नल यंत्रणेची चूक समोर आली आहे. याबाबतचा संयुक्त चौकशी अहवाल समोर आला असून इंडियन एक्स्प्रेसने त्यांसदर्भातील वृत्त दिले आहे. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/9

    बहनगा बाजार स्टेशनवर मालगाडी लूप लाईनवर उभी होती. यादरम्यान चेन्नईहून हावडाला जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्स्प्रेस बहनगा बाजार स्थानकावर पोहोचली. प्रत्येक स्थानकांवर ट्रेन पुढे जाण्याकरता एक लूप लाईन असते. बहनगा बाजार स्थानकाच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर लूप लाईन आहेत. जेव्हा एखादी ट्रेन संबंधित स्थानकावरून पास केली जाते तेव्हा दुसऱ्या ट्रेनला स्थानकाच्या लूप लाईनवर उभं केलं जातं. (फोटो – फायनान्स एक्स्प्रेस)

  • 4/9

    बहनगा बाजार स्थानकावरही कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पार करण्याकरता मालगाडीला कॉमन लूप लाईनवर उभं करण्यात आलं होतं. कोरोमंडल एक्स्प्रेस जलद गतीने मेन अप लाईनवरून जात होती. त्याचदरम्यान, डाऊन मार्गावरूनही यशवंत हावडा एक्स्प्रेस जात होती. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 5/9

    कोरोमंडल ट्रेनला बहनगा स्थानकात सुरुवातीला सिग्नल देण्यात आला होता. त्यानंतर हा सिग्नल काढून टाकण्यात आला. त्यामुळे ही ट्रेन लूप लाईनच्या पुढे आली. ही ट्रेन जलद वेगाने धावत असल्याने या ट्रेनचे डबे रुळांवरून घसरले आणि मालगाडीला आपटले. त्यामुळे या मालगाडीचाही अपघात झाला. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 6/9

    दरम्यान, डाऊन मार्गावरुन हावडा एक्स्प्रेस धावत होती. या ट्रेनचे मागचे काही डबे रुळांवरून घसरले आणि कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. (फोटो – पीटीआय)

  • 7/9

    तीन वेगवेगळ्या रुळांवरून धावणाऱ्या या एक्स्प्रेसना योग्य सिग्नल न मिळाल्याने एकाच वेळी एका मार्गावर या ट्रेन धडकल्या असा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 8/9

    दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील त्रुटी, लोको पायलटची चुकी यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, रेल्वे रुळावरून का घसरली याचेही कारण अद्याप समोर आलेले नाही. (फोटो – ANI)

  • 9/9

    ट्रेनमधील प्रवासी झोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. त्यामुळे तब्बल २६१ जणांचे जीव गेले आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी १२ लाखांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsरेल्वे अपघातRailway Accident

Web Title: Odisha train derailed live updates possible signalling error may have caused odisha train tragedy sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.