-
देशातील सर्वांत जास्त लांबीच्या शिवडी न्हावा शेवा या सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अटल सेतूवरून प्रवासही केला. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
गेल्या अनेक दिवसांपासून हा सागरी सेतूच्या उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यामुळे मुंबईतून रायगडमध्ये जाणं आता वेगवान होणार आहे. यामुळे मुंबईपासून इतर शहरं जवळ आली आहेत. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
दरम्यान या सागरी सेतूची माहिती सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
गेल्या काही दिवसांपासून मुंबई ट्रान्सहार्बर लिंकची चर्चा आहे. अटल सेतूचे फोटो पाहून प्रत्येकाला अभिमान वाटतो. हे फोटो मंत्रमुग्ध करणारे आहेत, असं मोदी म्हणाले. (फोटो – एकनाथ शिंदे / X)
-
या सेतूच्या बांधकामासाठी जेवढ्या वायर्स आहेत, त्यात पृथ्वीला दोनवेळा प्रदक्षिणा घालून होतील. ४ हावडा ब्रिज, ६ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार होऊ शकेल, एवढं बांधकाम साहित्य या सेतूसाठी वापरण्यात आलं आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. (फोटो – एकनाथ शिंदे / X)
-
या सागरी सेतूमुळे मुंबई आणि रायगडचं अंतर कमी झालं आहे. तसंच, नवी मुंबईसह पुणे आणि गोवा जवळ येणार आहे, असंही ते म्हणाले. (फोटो – एकनाथ शिंदे / X)
-
गेल्यावर्षी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोडचे काम प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या वर्षात मुंबईला पहिली बुलेट ट्रेनही मिळेल, असं आश्वासनही मोदींनी दिलं. (फोटो – एकनाथ शिंदे / X)
-
दरम्यान, आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लेक लाडकी योजनेचाही शुभारंभ करण्यात आला. (फोटो – एकनाथ शिंदे / X)
PHOTOS : “पृथ्वीला दोनवेळा प्रदक्षिणा होतील एवढ्या वायर्स, ४ हावडा ब्रिज बनतील एवढे साहित्य…”, मोदींनी सांगितली अटल सेतूची वैशिष्ट्ये
Mumbai Trans Harbour Link : मुंबईतील अटल सेतूची वैशिष्ट्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
Web Title: Photos wires enough to circle the earth twice material enough to make 4 howrah bridges modi told the features of atal setu sgk