-
दिल्लीत वसंत ऋतूचे आगमन झाले असून, हा ऋतु केवळ सुंदर हवामानच नाही, तर मंत्रमुग्ध करणारा ‘दिल्ली ट्युलिप फेस्टिव्हल २०२४’देखील घेऊन आला आहे. या फेस्टिव्हलदरम्यान दिल्ली शहर दोन लाखांपेक्षा जास्त ट्यूलिप्स फुलांनी बहरले आहे. (पीटीआय फोटो)
-
नवी दिल्ली महानगरपालिकेने आयोजित केलेल्या, यंदाच्या या महोत्सवात लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, जांभळा आणि अगदी काळ्या रंगांसह वेगवेगळ्या रंगांचे ट्यूलिप्स प्रदर्शित केली आहे. (पीटीआय फोटो)
-
असंख्य फुले थेट नेदरलँड्समधून आणली असल्याने, दिल्लीचा मध्यभाग अगदी ॲमस्टरडॅमच्या ट्यूलिप फेस्टिव्हलप्रमाणे दिसतो आहे. (पीटीआय फोटो)
-
याव्यतिरिक्त, डच दूतावासाने ४०,००० ट्यूलिप्सचे पाठवले असल्याने या कार्यक्रमाची भव्यता वाढली आहे. (पीटीआय फोटो)
-
१० फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा ट्यूलिप फेस्टिव्हल २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. १२ दिवस चालणारा हा महोत्सव चाणक्यपुरीतील शांतीपथ रोडच्या बाजूच्या लॉनवर सुरू होतो. (पीटीआय फोटो)
-
पर्यावरणाच्या जाणीवेसाठी, दिल्ली ट्यूलिप महोत्सवाच्या आयोजकांनी कचरा व्यवस्थापन धोरणे लागू केली आहेत आणि पर्यटकांना जबाबदरीने कचरा व्यवस्थापनाच्या पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले आहे. (पीटीआय फोटो)
-
या उत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असल्याने, सर्वजण या फेस्टिव्हलचा आनंद लुटू शकतात. (पीटीआय फोटो)
-
हे फेस्टिव्हल दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरू आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी कॅब, स्थानिक वाहतूक, खाजगी वाहने आणि मेट्रोसारख्या वाहतुकीचा वापर करता येऊ शकतो. (पीटीआय फोटो)
-
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या पर्यटकांसाठी राजीव चौक मेट्रो स्टेशन आणि जोरबाग मेट्रो स्टेशनचे पर्याय सोयीस्कर आहेत. (पीटीआय फोटो)
-
गेल्या वर्षी डिसेंबरच्या मध्यापासून प्रमुख उद्याने, बाग आणि चौकांमध्ये; तसेच उपराष्ट्रपतींच्या बंगल्याच्या परिसरात, ११ मूर्ती आणि शांती पथ येथे लागवडीस सुरुवात झाली. (पीटीआय फोटो)
Delhi Tulip Festival: एनडीएमसीने २ लाख ट्यूलिप्ससह केले वसंत ऋतुचे आगमन; पाहा हे विलोभनीय फोटो
यंदाच्या ट्यूलिप फेस्टिव्हलमध्ये लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, जांभळा आणि अगदी काळ्या रंगांसह वेगवेगळ्या रंगछटांमधील मनमोहक ट्यूलिप्स फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
Web Title: Delhi tulip festival ndmc celebrates arrival of spring with 200000 tulips see beautiful pictures fehd import dha