-
१४० पेक्षा जास्त विविध युद्धनौका असलेल्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या विविध हेलिकॉप्टर वेगवेगळी जबाबदारी आहे
-
फ्रान्सचे तंत्रज्ञान असलेले Aérospatiale Alouette III हेलिकॉप्टर ज्याला चेतक या नावानेही ओळखले जाते, याचा वापर वाहतूक, शोध आणि सुटका मोहिमांसाठी, टेहेळणीसाठी केला जातो
-
ब्रिटनच्या बनावटीचे SEAKING 42 (B/C) हे लिकॉप्टरचा वापर बहुउद्देशीय कारणांसाठी केला जातो. कमांडो कारवाईसाठीही हे हेलिकॉप्टर वापरले जाते
-
UH 3H हेलिकॉप्टरचा वापर हा मुख्यतः पाणबुडी विरोधी कारवाईंसाठी केला जातो
-
SEAKING 42 (B/C) आणि UH 3H ही हेलिकॉप्टर नौदलाचे मुख्य अंग आहेत. यांच्याशिवाय नौदलाच्या ताकदीचे वर्तुळ पुर्ण होऊ शकत नाही
-
HAL Dhruv Mk. 3 या भारतीय बनावटीचा टेहेळणी, शोध आणि सुटका मोहिम, वाहतूक याकरता केला जातो
-
आता नौदलाच्या हेलिकॉप्टर ताफ्यात अमेरिकेचे तंत्रज्ञान असलेल्या Sikorsky कंपनीचे MH 60R Seahawk हे हेलिकॉप्टर दाखल होत आहे
-
पाणबुडी विरोधी, युद्धनौका विरोधी कारवाई, शोध आणि सुटका, वैद्यकीय आणीबाणी, मालवाहतूक अशा विविध कारणांसाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार आहे
-
नौदलाच्या कोची इथल्या INS Garuda या तळावर येत्या ६ मार्चला कार्यक्रम होच असून पहिल्या टप्पात सहा आणि त्यानंतर एकुण २४ हेलिकॉप्टर सेवेत दाखल होणार आहेत ( For all Images Courtesy – https://indiannavy.nic.in/ and @indiannavy )
Photos: नौदलाच्या ताफ्यात अत्याधूनिक MH 60R Seahawk हेलिकॉप्टर दाखल होणार
नौदलाच्या ताफ्यात ताज्या दमाची, अत्याधूनिक तंत्रज्ञान असलेली हेलिकॉप्टर MH 60R Seahawk दाखल होत आहेत. यामुळे नौदलाच्या संचार आणि मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
Web Title: Indian navy commissioning modern multirole helicopter mh 60r seahawk at ins garuda kochi asj