-
टायटॅनिक जहाज पूर्ण झाले तेव्हा त्याची जगभरात चर्चा झाली. या जहाजावरील पहिल्या प्रवासासाठी अनेकांनी तिकिटे खरेदी केली होती. तर अनेकांना तिकिटे न मिळाल्याने त्यांची निराशादेखील झाली होती. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
१० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक हे सर्वात मोठे प्रवासी जहाज साउथॅम्प्टन येथून न्यूयॉर्कच्या प्रवासासाठी निघाले होते. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
चार दिवसांच्या प्रवासानंतर १४ एप्रिल १९१२ रोजी, रात्री ११:४० वाजता हे प्रवासी जहाज हिमखंडावर आदळले. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
टक्कर झाल्यानंतर सुमारे २ तास ४० मिनिटांनी हे जहाज १५ एप्रिल १९१२ रोजी, उत्तर अटलांटिक महासागरात पूर्णपणे बुडाले. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
वाफेवर चालणाऱ्या टायटॅनिक जहाजाच्या पहिल्या प्रवासात एकूण २२४० प्रवासी सहभागी झाले होते. या प्रवाशांव्यतिरिक्त, जहाजावर काम करणारे इतर कर्मचारी सदस्यदेखील जहाजावर हजर होते. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
या अपघातात सुमारे १५०० लोकांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला ११२ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सागरी अपघात मानला जातो. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
टायटॅनिक दुर्घटनेची इतिहासाच्या पानांमध्ये नोंद झाली आहे जी पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. पण तुम्हाला टायटॅनिक या जहाजाचे पूर्ण नाव माहित आहे का? (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
-
या जहाजाचे पूर्ण नाव ‘RMS Titanic’ होते, ज्यामध्ये RMS म्हणजे ‘रॉयल मेल शिप’. (फोटो स्त्रोत: @rmstitanicofficial/Instagram)
(हे देखील वाचा: Skin care : उन्हाळ्यातही चेहरा दिसेल टवटवीत अन् चमकदार! ‘चहा’ करेल तुमची मदत; टीप पाहा )
११२ वर्षांपूर्वी घडली होती टायटॅनिक जहाजाची दुर्दैवी घटना! पाहा थोडक्यात माहिती
टायटॅनिक १९१२ साली जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १५ एप्रिल १९१२ च्या रात्री, जहाजाच्या पहिल्या प्रवासादरम्यान, त्याचा दुर्दैवी अपघात झाला. ज्यामध्ये १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
Web Title: Titanic history sinking facts and full name jshd import dha