• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. loksabha election candidates in mumbai and thane and their works sgk

विद्यमान खासदारांविरोधात विद्यमान आमदार रिंगणात, तर गृहिणींनाही संधी! मुंबई-ठाण्यात कोणाविरोधात कोणाची लढत?

2024 Lok Sabha Election : मुंबई आणि ठाण्यात सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे कोणाविरोधात कोण बाजी मारणार हा चर्चेचा विषय ठरला आहे.

May 4, 2024 14:22 IST
Follow Us
  • यंदाची लोकसभा निवडणुकीची लढत थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे. दोहोंकडूनही जागावाटप जाहीर झालं आहे.
    1/9

    यंदाची लोकसभा निवडणुकीची लढत थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे. दोहोंकडूनही जागावाटप जाहीर झालं आहे.

  • 2/9

    काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होतेय. तर काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि ठाण्यात कोणत्या जागेवरून कोणाला उमेदवारी दिलीय आणि कोणाविरोधात कोण लढतंय हे पाहुयात.

  • 3/9

    दक्षिण मुंबई
    अरविंद सावंत –
    तिसऱ्यांदा रिंगणात उतरलेले अरविंद सावंत हे गेले दहा वर्षे खासदार आहे. केंद्र सरकारच्या जागेवरील झोपड्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याचा आप, जुन्या चाळी आणि इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित. लोकसभेत आक्रमक आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पुढाकार ही जमेची बाजू. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वादग्रस्त प्रतिमेचाही फायदा होण्याची शक्यता.
    यामिनी जाधव
    – भायखळा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार असलेल्या यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे दीर्घकाळ स्थायी समिती अध्यक्ष राहिले आहेत. जाधव यांच्यावर प्रचंड बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप आहे. ईडी, प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमुळे त्या चर्चेत होत्या. भ्रष्टाचारे मुद्दे प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे.

  • 4/9

    दक्षिण मध्य मुंबई
    अनिल देसाई – मलबार हिलमध्ये वास्तव्य असलेले माजी खासदार अनिल देसाई हे मतदारसंघात उपरे उमेदवार आहेत. धारावी पुनर्विकासाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चाचा फायदा होण्याची शक्यता. स्थानिक आमदार वर्षा गायकवाड यांची साथ असल्याने ही जमेची बाजू. मुस्लीम मतदारांचा पाठिंबा मिळण्याची आशा. मात्र झोपडीबहुल भागांतून प्रतिसादाबद्दल साशंकता. पक्षाच्या ५० कोटींच्या निधीवरून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाल्याचा मुद्दा प्रतिकूल ठरण्याची शक्यता.

    राहुल शेवाळे – दहा वर्षे खासदार राहिलेले राहुल शेवाळे यांना झोपडीबहुल भागांतून चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता. मात्र, धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून कोंडी होण्याची शक्यता. पुनर्विकासाचे समर्थन केल्यामुळे स्थानिकांत नाराजी. मतदारसंघात विशेष प्रभाव पाडू न शकल्याचा विरोधकांचा आरोप. मनसेचा पाठिंबा ही जमेची बाजू.

  • 5/9

    उत्तर मध्य मुंबई
    वर्षा गायकवाड – मतदारसंघाच्या बाहेर वास्त्वय असलेल्या मात्र दलित, मुस्लीम, ख्रिश्चन आणि दाक्षिणात्या मतदारांची संख्या लक्षात घेता पक्षाकडून उमेदवारी दिली. या मतदारांकडून चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. एकेकाळी काँग्रेसला अनुकूल असलेल्या मतदारसंघात आता भाजपाचे वर्चस्व असले तरीही चांदिवलीचे माजी आमदार नसीम खान यांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता.
    अॅड उज्ज्वल निकम – विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याएवजी उमेदवारी मिळालेले उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध वकिल आहेत. परंतु राजकारणात नवखे आहे. त्यामुळे पक्षाच्या अन्य नेत्यांवर भिस्त असेल. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला किंवा बॉम्बस्फोट मालिकेत विशेष सरकारी वकील म्हणून काम केलेल्या कामगिरीच्या आधारे हिंदुत्त्ववादी, राष्ट्रवादी प्रतिमा तयार करण्यावर निकम यांचा भर. विलेपार्लेमध्ये मिळणारे मताधिक्य याबरोबरच मराठी, उत्तर भारतीय, गुजराती मारवाडी जैन मतदारांच्या भक्कम पाठिंब्यावर मदार.

  • 6/9

    वायव्य मुंबई
    रवींद्र वायकर – ईडी चौकशीत अटकेच्या भीतीने गेल्याच महिन्यात ठाकरे गटातून शिंदे गटात उडी घेणारे रवींद्र वायकर हे जोगेश्वरीचे अनेक वर्षे आमदार राहिले आहेत. शिवसेनेत विविध पदांवर काम त्यांनी केलं असून शिंदे गटात ते नवखे आहेत. भाजपाच्या स्थानिक नेत्यांशी फारसे सख्य नसल्याने आव्हान आहे. मराठी, मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, उत्तर भारतीयांची मते मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. वायकर यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपाचीही पंचाईत होईल.
    अमोल कीर्तिकर – विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. वडील शिंदे गटात तर अमोल हे ठाकरे गटात असल्याने कुटुंबातच विभागणी झालीय. विभागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. मात्र खिचडी घोटाळ्यात ईडीकडून चौकशी झाल्याने वादग्रस्त ठरले आहेत. गैरव्यवहारांच्या आरोपांवरून विरोधकांकडून कोंडी होण्याची शक्यता आहे.

  • 7/9

    ईशान्य मुंबई
    मिहिर कोटेचा – विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याएवजी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. गुजराची मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या भाजपाला अनुकूल असलेले तीन विधानसभा मतदारसंघ या जमेच्या बाजू. पक्षाची मजबूत संघटनात्मक बांधणी फायदेशीर, मात्र मराठी विरुद्ध बिगरमराठई वादाला फोडणी देण्याच्या प्रयत्नांमुळे अडचण होण्याची शक्यता.
    संजय दिना पाटील – २००९ मध्ये राष्ट्रवादीतून खासदार झालेले संजय दिना पाटील यांचे मानखुर्द मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. यंदाही त्यांची मुस्लीम मतांवर भिस्त असेल.

  • 8/9

    ठाणे
    नरेश म्हस्के – ठाण्याचे माजी महापौर असलेले नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. तळागाळातील कार्यकार्त म्हणून ठाणे शहरात चांगला जनसंपर्क. नरेंद्र मोदी यांना मानणाा मोठा मतदारवर्ग असल्याचा फायदा. शिंदे यांच्या निवडणूक व्यवस्थापन कौशल्याचीही मदत होईल. मात्र नवी मुंबई, मीरा भाईंदरमधील तीन मतदारसंघात पूर्णपणे नवखे. नवी मुंबईत नाईक समर्थकांकडून पूर्णपणे मदत होण्याबाबतही साशंकता.
    राजन विचारे– विद्यमान खासदार असलेले राजन विचारे यांना ठाकरे गटाने यंदाही संधी दिली. एकत्रित शिवसेना-भाजपा युती असताना २०१९ मध्ये चार लाखांच्या मताधिक्क्याने ते विजयी झाले होते. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला फोडण्याचे आव्हान आहे. मातोश्री बरोबर एकनिष्ठ राहिल्याने जुन्या शिवसैनिकांचे समर्थन. पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीचाही फायदा. काँग्रेस राष्ट्रवादीची परंपरांगत मतांची साथ पुरेशी ठरण्याबाबत मात्र साशंकता.

  • 9/9

    कल्याण
    डॉ. श्रीकांत शिंदे – विद्यमान खासदार असलेले डॉ.श्रीकांत शिंदे यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. शिवेसना भाजपा समर्थक मतदारसंघ असल्याचा फायदा. त्यात मनसेच्या पाठिंब्यामुळे लढत सोपी होईल. मात्र स्थानिक पातळीवर मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्याचे आव्हान. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मतदारसंघात सुरू केलेल्या कामांचाही फायदा होण्याची शक्यता.
    वैशाली दरेकर – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या असलेल्या वैशाली दरेकर या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेतर्फे रिंगणात होत्या. शिंदे यांच्या तुलनेत मतदारसंघात फारसा प्रभाव नाही. मात्र लढतीला गृहिणी विरुद्ध मुख्यमंत्री पुत्र असे चित्र देण्याचा प्रयत्न.

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Loksabha election candidates in mumbai and thane and their works sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.