-
आज आषाढी एकादशी आहे.
-
वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची आणि दर्शनाची ओढ लागलेला तो दिवस आज आला आहे. राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी वारी करून पोचत असतात.
-
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दरवर्षी महापूजेचे आयोजन केले जाते.
-
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते, त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी या महापूजेला कुटुंबियांसह हजेरी लावली.
-
आज आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली.
-
मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही यावेळी उपस्थित होते.
-
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूजाऱ्यांशी संवादही साधला.
-
दरम्यान यावर्षी शासकीय पूजेव्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे, ( वय ५५ ) वर्षे, सौ. आशाबाई बाळू अहिरे ( वय ५० ) यांना मानाचा वारकरी म्हणून महापूजेचा मान मिळाला.
-
बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.
-
(सर्व फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)
PHOTOS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान
आज आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे.
Web Title: Ashadhi ekadashi 2024 pandharpur wari mahapuja cm eknath shinde photos spl