-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील त्यांच्या निवासस्थानी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकावला. (पीटीआय फोटो)
-
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नडियादमध्ये ध्वजारोहण केले.
-
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रांची येथील मोरहाबादी मैदानावर ध्वजारोहण केले.
-
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी कुरुक्षेत्र येथे तिरंगा फडकवला.
-
पुद्दुचेरी येथे 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात मानवंदना घेताना पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी. (पीटीआय फोटो)
-
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटी येथे 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकावला. (पीटीआय फोटो)
-
भोपाळ येथे 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ध्वजारोहण केले आणि परेडची सलामी घेतली. (पीटीआय फोटो)
-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथील 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात गांधी मैदानावर तिरंगा फडकवला. (पीटीआय फोटो)
-
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकावला आणि राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. (पीटीआय फोटो)
-
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आगरतळा येथे 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकावला. (पीटीआय फोटो)
-
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमध्ये 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकावला. (पीटीआय फोटो)
-
15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा केला. (पीटीआय फोटो)
हेही वाचा : Independence Day PM Modi Look : पांढरा कुर्ता, निळं जॅकेट आणि खास फेटा, पाहा पंतप्रधान मोदींचा लाल किल्ल्यावरील लूक
Independence Day 2024: देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तिरंगा फडकावून जनतेला दिल्या शुभेच्छा, पाहा फोटो
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात ध्वजारोहण करून हा ऐतिहासिक दिवस अभिमानाने साजरा केला. देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ध्वजारोहणाची छायाचित्रे पाहूया.
Web Title: Independence day 2024 chief ministers of all states congratulated by hoisting tricolor spl