-

भारतीय हवामान विभागाने बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळासह गंभीर हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. ताज्या अहवालानुसार, बुधवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत शहरात ६६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि सखल भागांत पाणी साचले असून रहिवाशांच्या रोजच्या जीवनावरही परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बेंगळुरू शहरी जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. बेंगळुरूमधील आपत्कालीन परिस्थितींवर लक्ष ठेवण्यासाठी, कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडा यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि कर्नाटक राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) चे कर्मचारी तैनात केले आहेत. आयएमडीने असा इशाराही दिला आहे की, केवळ बेंगळुरूच नव्हे तर किनारपट्टी आणि अंतर्गत कर्नाटकातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. शहरात तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
-
मंगळवारी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. (फोटो: पीटीआय फोटो)
-
बंगळुरूमध्ये ‘स्पॉन’ चक्रीवादळामुळे सोसाट्याचे वारे वाहत असताना चाकरमानी पावसात प्रवास करत आहेत. (फोटो: पीटीआय)
-
बेंगळुरूत मंगळवारी रात्री मुसळधार पावसानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. (फोटो: पीटीआय फोटो)
-
बुधवार, १६ ऑक्टोबर २०२४ रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळपट्टी झाकली गेली. (फोटो: PTI)
-
IMD ने देखील सूचित केले आहे की बेंगळुरूमध्ये १८ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (फोटो: पीटीआय)
-
बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसात डिलिव्हरी बॉईज पाणी साचलेल्या रस्त्यावरून त्यांचं काम करत आहेत. (फोटो: पीटीआय)
-
बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसात छत्री वापरून लोक कामासाठी प्रवास करताना. (फोटो: पीटीआय)
-
मुसळधार पावसानंतर पाणी साचलेली एक सोसायटी. (फोटो: पीटीआय)
-
न्यूझीलंडचे खेळाडू मार्क चॅपमन आणि मिचेल सँटनर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यापूर्वी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रशिक्षण सत्रानंतर निघून जाताना. (फोटो: पीटीआय)
-
दरम्यान, मुसळधार पावसामुळे बंगळुरूतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (फोटो: पीटीआय)
Bengaluru Rains: बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, एनडीआरएफचे बचाव पथक तैनात
भारतीय हवामान विभागाने बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळासह गंभीर हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. ताज्या अहवालानुसार, बुधवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत शहरात ६६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Web Title: Bengaluru rains ndrf comes to rescue as heavy rainfall continues to disrupt daily life see images spl