• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. operation sindoor aftermath of pahalgam attack india responds with missile strikes citizens celebrate nationwide spl

Photos: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशात दिवाळीसारखे वातावरण; लोकांनी पेढे भरवले, फटाके फोडले, साजरा केला विजयोत्सव…

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या धाडसी कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले.

Updated: May 7, 2025 18:45 IST
Follow Us
  • Operation Sindoor
    1/16

    बुधवार, ७ मे २०२५ रोजी, भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. (PTI Photo)

  • 2/16

    या हल्ल्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर मानले जात आहे, ज्यामध्ये अनेक निष्पाप नागरिक आणि सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. भारताने केलेल्या या कारवाईची माहिती मिळताच देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लोक रस्त्यावर आले, तिरंगा फडकावला, मिठाई वाटली, फटाके फोडले आणि ‘भारत माता की जय’ या घोषणा दिल्या. (PTI Photo)

  • 3/16

    दिल्लीपासून लखनौ, पाटणा, वाराणसी, अजमेर आणि बिकानेरपर्यंत सर्वत्र उत्सवाचे वातावरण दिसून आले. (PTI Photo)

  • 4/16

    लोकांनी मिठाई वाटली, फटाके फोडले आणि सारा आसंमत ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी दुमदुमला.(PTI Photo)

  • 5/16

    अजमेरमध्ये लोक आणि भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
    अजमेरमध्ये स्थानिक नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मोर्चा काढून या कृतीचे कौतुक केले. (PTI Photo)

  • 6/16

    हातात तिरंगा धरून लोकांनी घोषणाबाजी केली आणि पेढे वाटले. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आनंदाचत अधिकच भर पडली. (PTI Photo)

  • 7/16

    लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याला सलाम केला आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांना ही खरी श्रद्धांजली असल्याचे म्हटले. (PTI Photo)

  • 8/16

    लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि पटना येथे उत्सवाचे वातावरण
    उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये, शालेय विद्यार्थी आणि विश्व हिंदू रक्षा परिषदेच्या सदस्यांनी १०९० चौकात तिरंगा फडकावून आनंद साजरा केला. (PTI Photo)

  • 9/16

    तर प्रयागराजमध्ये लोकांनी फटाके फोडले, शंख वाजवले आणि एकमेकांना पेढे भरवून अभिनंदन केले. (PTI Photo)

  • 10/16

    वाराणसीमध्ये, ‘नमामि गंगे’ कार्यक्रमाशी संबंधित सदस्यांनी ‘भारत माता’ आणि पंतप्रधान मोदी यांचे पोस्टर हातात घेऊन रॅली काढली. (PTI Photo)

  • 11/16

    पाटण्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकावून सैन्याच्या शौर्याला सलाम केला. (PTI Photo)

  • 12/16

    बिकानेर आणि रांचीमध्येही देशभक्ती दिसून आली.
    बिकानेर आणि रांचीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि तिरंगा फडकावून देशभक्ती दाखवली. (PTI Photo)

  • 13/16

    बिकानेरमधील शिक्षकांनीही ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल आनंद व्यक्त केला आणि त्याला ‘नवीन भारताची’ ताकद म्हटले. (PTI Photo)

  • 14/16

    लोक म्हणतात की मोदी सरकारने हे स्पष्ट केले आहे की आता भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन करणार नाही. हा ‘नवा भारत’ आहे जो उत्तराची वाट पाहत नाही तर थेट कृती करतो. (PTI Photo)

  • 15/16

    ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एक लष्करी ऑपरेशन नाही, तर ते संपूर्ण राष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि सुरक्षिततेच्या भावनेचे प्रतीक बनले आहे. (PTI Photo)

  • 16/16

    ‘ऑपरेशन सिंदूर’ ने पुन्हा एकदा सिद्ध केले की भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. आज, देश आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोपरि मानून दहशतवादाविरुद्ध निर्णायक पावले उचलत आहे. (PTI Photo) हेही पाहा- फक्त पहलगामच नाही तर भारताने ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानने केलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतला आहे, वाचा…

TOPICS
ऑपरेशन सिंदूरOperation Sindoorकाश्मीरKashmirदहशतवादी हल्लाTerror AttackपहलगामPahalgamमराठी बातम्याMarathi News

Web Title: Operation sindoor aftermath of pahalgam attack india responds with missile strikes citizens celebrate nationwide spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.