• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pm modi visits air india plane crash site in ahmedabad meets survivors and injured fehd import asc

Photos | पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस

अहमदाबाद-लंडन विमान अपघातात बोईंग ७८७-८ विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी एअर इंडियाने केली आहे.

June 13, 2025 21:03 IST
Follow Us
  • एअर इंडियाचं अहमदाबाद-लंडन विमान गुरुवारी (१२ जून) दुपारी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळानजीक दुर्घटनाग्रस्त झालं आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावरून २६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या विमानात १२ क्रू सदस्यांसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यांच्यापैकी केवळ एक प्रवासी बचावला आहे. तर, उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हे विमान मेघानी नगरमधील नागरी वस्तीत (डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या इमारतीवर) कोसळल्यामुळे वस्तीतही मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. विमान कोसळल्यामुळे मेघानी नगरमधील २४ रहिवासी मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ जून) अहमदाबादला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. (PC : Narendra Modi/X, ANI,PTI)
    1/10

    एअर इंडियाचं अहमदाबाद-लंडन विमान गुरुवारी (१२ जून) दुपारी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळानजीक दुर्घटनाग्रस्त झालं आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावरून २६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या विमानात १२ क्रू सदस्यांसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यांच्यापैकी केवळ एक प्रवासी बचावला आहे. तर, उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हे विमान मेघानी नगरमधील नागरी वस्तीत (डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या इमारतीवर) कोसळल्यामुळे वस्तीतही मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. विमान कोसळल्यामुळे मेघानी नगरमधील २४ रहिवासी मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ जून) अहमदाबादला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. (PC : Narendra Modi/X, ANI,PTI)

  • 2/10

    अहमदाबाद-लंडन विमान दुर्घटनेत बोईंग ७८७-८ विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी एअर इंडियाने केली आहे. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे. (छायाचित्र स्रोत – पीटीआय)

  • 3/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी घटनास्थळाला भेट दिली. तसेच अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन पीडितांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. (छायाचित्र स्रोत – नरेंद्र मोदी/एक्स)

  • 4/10

    दुर्घटनस्थळाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्यांनी म्हटलंय, “आज अहमदाबादमधील दुर्घटनस्थळाला भेट दिली. विध्वंसाचे दृश्य दुःखद आहे. त्यानंतर अथक परिश्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि टीमना भेटलो. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल आमच्या सहवेदना आहेत. (छायाचित्र स्रोत – नरेंद्र मोदी/एक्स)

  • 5/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एअर इंडिया विमान अपघातातील जखमींची भेट घेतली. त्यांनी या दुर्घटनेतून वाचलेले एकमेव व्यक्ती विश्वास कुमार रमेश यांचीही भेट घेतली. (छायाचित्र स्रोत – एएनआय)

  • 6/10

    गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी हे यावेळी पंतप्रधान मोदींबरोबर होते. (छायाचित्र स्रोत – नरेंद्र मोदी/एक्स)

  • 7/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आहे आणि पीडितांना योग्य मदत पुरवली जाईल याची खात्री केली. (छायाचित्र स्रोत – एएनआय)

  • 8/10

    अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. (छायाचित्र स्रोत – एएनआय)

  • 9/10

    विमान अपघातातील जखमींवर उपचार सुरू असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला पंतप्रधानांनी भेट दिली आणि त्यांच्याप्रती शोक व्यक्त केला. (छायाचित्र स्रोत – पीटीआय)

  • 10/10

    मोदी यांनी जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही काही सूचना केल्या. (छायाचित्र स्रोत – पीटीआय)

TOPICS
अहमदाबादAhmedabadएअर इंडियाAir Indiaनरेंद्र मोदीNarendra Modiविमान अपघातPlane Crash

Web Title: Pm modi visits air india plane crash site in ahmedabad meets survivors and injured fehd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.