-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सायप्रस देशात पोहोचले आहेत. त्यांचा तीन देशांचा दौरा १५ जूनपासून सुरू झाला आहे. (Photo: Narendra Modi/X)
-
या दौऱ्यात ते सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांना भेट देणार आहेत. (Photo: Narendra Modi/X)
-
सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी अशा काळात सायप्रसला भेट देत आहेत जेव्हा भारत आणि तुर्कीचे संबंध बिघडले आहेत, तुर्की आणि सायप्रस या देशांमध्येही वाद सुरू आहेत. मागील महिन्यात भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान तुर्कीने पाकिस्तानचे उघडपणे समर्थन केले होते. (Photo: Narendra Modi/X)
-
गेल्या दोन दशकांमध्ये सायप्रसला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. (Photo: Narendra Modi/X)
-
सायप्रसची राजधानी निकोसिया येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केल्याबद्दल अध्यक्ष क्रिस्टोडोलाइड्स यांचे आभार मानले आहेत. (Photo: Narendra Modi/X)
-
याबद्दलची पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आली आहे. द्विपक्षीय संबंधांसाठी, विशेषत: व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरेल असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (Photo: Narendra Modi/X)
-
दरम्यान, सायप्रसमधल्या दोन दिवस महत्त्वाच्या भेटीगाठी आणि चर्चांनंतर मोदी १६ आणि १७ जूनला कॅनडात होत असलेल्या जी-७ शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. (Photo: Narendra Modi/X)
-
दरम्यान, पंतप्रधान सायप्रसमध्ये पोहोचले तेव्हा तिथल्या भारतीयांनी त्यांचे उत्साहामध्ये स्वागत केले. (Photo: Narendra Modi/X)
-
स्वागत केल्याबद्दल मोदींनी सोशल मीडियावरून आभार व्यक्त केले आहेत. (Photo: Narendra Modi/X)
-
मोदींच्या स्वागतादरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेचा फलकही पाहायला मिळाला. (Photo: Narendra Modi/X) हेही पाहा-
Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौऱ्यासाठी सायप्रसची का केली निवड; तुर्कीशी काय आहे कनेक्शन?
Prime Minister Narendra Modi Cyprus Visit : सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले.
Web Title: Pm narendra modi cyprus visit welcomed by indian citizens president nikos christodoulides see photos spl