• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ashadhi wari 2025 sant tukaram maharaj palkhi prasthan cm devendra fadnavis fugadi photos kjp 91 sdn

Photos: भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी वारकऱ्यांसह खेळली फुगडी

पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.

June 18, 2025 17:52 IST
Follow Us
  • Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan
    1/16

    Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan Today: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला.

  • 2/16

    तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पावसाच्या आगमनात पालखीचे प्रस्थान ठेवले.

  • 3/16

    पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.

  • 4/16

    देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची पहिली आरती होईल.

  • 5/16

    ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने एक-एक पाऊल टाकतील.

  • 6/16

    त्यानंतर जगतगुरु तुकोबांची पालखी उद्योगनगरी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.

  • 7/16

    टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.

  • 8/16

    सोमवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते.

  • 9/16

    आज सकाळी देखील इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतले.

  • 10/16

    पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात झाली.

  • 11/16

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होते.

  • 12/16

    पालकमंत्री अजित पवार यांनी आधीच देहू मंदिरात भेट देऊन तुकोबांच दर्शन घेतल.

  • 13/16

    मावळचे खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके यांची देखील उपस्थिती होती.

  • 14/16

    वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू, आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात.

  • 15/16

    ज्ञानोबा- तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ- मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून देतात.

  • 16/16

    फुगडी, भगवी पताका घेऊन एक-एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे. (सर्व फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ/लोकसत्ता)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५

Web Title: Ashadhi wari 2025 sant tukaram maharaj palkhi prasthan cm devendra fadnavis fugadi photos kjp 91 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.