-
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
पण शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासंदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. या प्रकरणावरील सुनावणीला आता पुढील तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? या विषयाची सुनावणी आता ऑगस्टमध्ये होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं असल्याचं वकील असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत जो निर्णय दिलेला आहे, यावरील सुनावणी लवकरात लवकर झाली पाहिजे, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
पण सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत असं मत व्यक्त केलं आहे की मूळ जी याचिका आहे, त्या याचिकेवरील सुनावणीबरोबरच ही देखील सुनावणी घेतली जाईल, असं न्यायालयाने म्हटल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या दरम्यानच शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? याबाबतचा निर्णय येण्याची शक्यता आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमधील तारीख सांगितल्याचं वकील असीम सरोदे यांनी सांगितलं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल. आमच्या हस्तक्षेप याचिकेचा हेतू सफल झाला असल्याचं वकील असीम सरोदे यांनी सांगितलं.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचं विधान करत शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबतीतील अर्ज दाखल करणं बंद करा, आता सुनावणी आता ऑगस्टमध्ये होईल असं सांगिल्याचं बोलल जात आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
Shivsena Hearing : शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर ॲड. असीम सरोदे काय म्हणाले?
Shivsena Hearing : आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. या प्रकरणावरील सुनावणीला आता पुढील तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
Web Title: Shivsena hearing whose shiv sena is it what did adv asim sarode say after the supreme court hearing gkt