scorecardresearch

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची (Shivsena Udhhav Thackeray) स्थापना २०२३ साली झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गटाचे प्रमुख आहेत. २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. विधान परिषद निवडणुकीची मतमोजनी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले. शिवसेना पक्षाशी बंडखोरी करत शिंदे यांनी बहुसंख्य शिवसेना आमदारांसह भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. राज्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट उदयास आले.


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरदेखील दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.


शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी होत विरोधकाची भूमिका बजावत आहे. असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. तर महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागा त्यांनी जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांना १५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले.


निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४ जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागा त्यांनी जिंकल्या तर वायव्य मुंबईची जागा त्यांनी ४८ मतांनी गमावली. यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईत वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. लोकसभा पाठोपाठ उद्धव ठाकरे गटाने मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही विजय मिळवला.


Read More
nagpur bacchu kadu farmer protest Bhaskar Jadhav prediction about Bachchu Kadu
बच्चू कडूंबद्दल भास्कर जाधव यांनी केलेले भाकित सरकारने दोन दिवसात खरे ठरवले

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडूंना सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला असतानाच, सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर…

Shiv Sena UBT protested in Solapur against Bharat Gogavale’s remarks on Rashmi Thackeray
भारत गोगावलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गट रस्त्यावर

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ भरत गोगावले यांच्या विरोधात…

No district chief in Parbhani UBT Shiv Sena
शिवसेनेचा बालेकिल्ला जिल्हाप्रमुखांविना ! परभणीत ‘उबाठा’पक्षाचे संपर्कप्रमुख पदही रिक्तच

शिवसेनेच्या संघटनात्मक पद्धतीत संपर्कप्रमुखपद हेही महत्त्वाचे मानले जाते. सुभाष भोयर हे संपर्कप्रमुख होते. जिल्ह्याची पक्ष संघटना आणि पक्ष नेतृत्व यांच्यात…

Imtiaz Jaleel said Uddhav and Raj Thackeray must unite to expel BJP from Maharashtra
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणे काळाची गरज, इम्तियाज जलील

भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे असेल तर उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू राज ठाकरे दोघेही एकत्र येणे ही काळाची गरज आहे…

government treat bacchu kadu in same way as jarange ubt leader Bhaskar Jadhav alleges in nagpur
जरांगे सारखीच अवस्था सरकार बच्चू कडूंची करणार; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा आरोप

भाजप प्रणित हे सरकार बच्चू कडूचे जरांगे पाटील करणार नाही, याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही, असे जाधव म्हणाले.

राज-उद्धव एकत्र? राज्यातल्या नेत्यांचे अंदाज काय?

Raj and Uddhav Thackrey alliance: मैत्रीपूर्ण संबंध असूनही राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही. दोन्ही नेत्यांची…

Sanjay Shirsat comments on uddhav Thackeray raj thackeray alliance
मला उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी देखील जाऊ शकतो : संजय शिरसाट

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले असताना, मंत्री संजय शिरसाट यांनी “आमच्या शुभेच्छा…

nagpur Vijay Vadettiwar on Fadnavis Raj Thackeray meet
फडणवीसांना उद्धव-राज यांना एकत्र येऊ द्यायचे नाही – वडेट्टीवार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता असताना, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन हे एकत्रीकरण रोखण्याचा…

Uday Samant criticizes Uddhav Thackeray after raj Thackeray Devendra Fadnavis meeting
राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या अटींना जुमानत नाहीत, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा टोला

राज ठाकरे महायुती बरोबर आल्यास महायुतीची ताकद वाढणार आहे. महायुतीतील मनसेच्या सहभागाचा निर्णय हे महायुतीचे तीन नेते घेणार असल्याचे सुतोवाच…

Shiv Sena UBT protested in Sambhajinagar Thursday to highlight farmers issues to ruling parties
शेतकरी प्रश्नावर शिवसेना आक्रमक; मराठवाड्यात ठाकरे गटाचा विविध ठिकाणी रास्ता रोको

राज्यातील सत्ताधारी पक्षांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात आंदोलन केले.

Uddhav Thackeray Raj Thackeray Devendra Fadnavis alleged Meeting
“आमचं ९५ टक्के…”, राज ठाकरे – देवेंद्र फडणवीस भेटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य फ्रीमियम स्टोरी

Kishori Pednekar on Raj Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वी वांद्रे येथील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये दाखल झाले…

संबंधित बातम्या