• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. odisha forest official raid cash gold silver and luxurious building worth 1 43 crores notes found in forest officers house odisha vigilance department takes action gkt

Forest Official Raid : १.४३ कोटींची रोकड, सोनं, चांदी, अलिशान इमारत; वन अधिकाऱ्याच्या घरात आढळले नोटांचे ढीग; दक्षता विभागाची कारवाई

ओडिशातील एका कनिष्ठ श्रेणीच्या वन अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची रोकड सापडल्याची घटना समोर आली आहे.

July 26, 2025 12:40 IST
Follow Us
  • Odisha Forest Official Raid Cash
    1/9

    ओडिशातील एका कनिष्ठ श्रेणीच्या वन अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची रोकड सापडल्याची घटना समोर आली आहे. दक्षता विभागाने शुक्रवारी (२५ जुलै) ही कारवाई केली. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/9

    ओडिशा दक्षता विभागाने वन अधिकाऱ्याच्या घरावर छापे टाकले असता दोन घरांमधून १.४३ कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. (फोटो-एएनआय एक्स व्हिडीओ)

  • 3/9

    ओडिशा दक्षता विभागाने केलेल्या या कारवाईत १.४३ कोटींपेक्षा जास्त रुपयांची रोख रक्कम आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि महागडे कपडेही आढळून आले आहेत.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 4/9

    कारवाईत काय आढळलं? : या अधिकाऱ्याकडे घराच्या एका गुप्त तिजोरीत लपवून ठेवलेली १.४३ कोटी रुपयांची रोकड, १.३२ कोटींचे बँक डिपॉझिट, १.५ किलो सोने आणि ४.६३७ किलो चांदी आढळून आली आहे. (फोटो-एएनआय)

  • 5/9

    कोरापूत जिल्ह्यातील जयपुर फॉरेस्ट रेंज येथील डेप्युटी रेंजर रामचंद्र नेपाक यांच्याशी संबंधीत सहा मालमत्तांवर एकाच वेळी शुक्रवारी दक्षता विभागाने धाडी टाकल्याची माहिती दक्षता विभागाने दिली आहे. (फोटो-एएनआय)

  • 6/9

    अधिकाऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे पाच महिन्यानंतर हे अधिकारी सेवेतून निवृत्त होणार होते, त्याआधी ही कारवाई झाली. (फोटो-एएनआय)

  • 7/9

    ओडिशा दक्षता विभागाच्या कारवाईत या अधिकाऱ्याकडे स्थावर मालमत्तेमध्ये ३,६०० चौरस फूट क्षेत्रफळाची तीन मजली इमारत, भुवनेश्वरमध्ये १,८०० चौरस फूट क्षेत्रफळाचा ३ बीएचके फ्लॅट आणि जयपुर शहरात १,५०० चौरस फूटाचे दोन फ्लॅट आणि दोन महागडे प्लॉट सापडले आहेत.  (फोटो-एएनआय)

  • 8/9

    ओडिशा दक्षता विभागाच्या या कारवाईत एका वन अधिकाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि कोट्यवधींची रोकड सापडल्यामुळे ओडिशामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.(फोटो-एएनआय)

  • 9/9

    ओडिशा दक्षता विभागाने केलेल्या या कारवाईत कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आल्यानंतर आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. (फोटो-एएनआय)

TOPICS
ओडिशाOdishaपोलीसPoliceपोलीस अधिकारीPolice OfficersरेडRaid

Web Title: Odisha forest official raid cash gold silver and luxurious building worth 1 43 crores notes found in forest officers house odisha vigilance department takes action gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.