-
रशियातल्या भूकंपाने झालेला विध्वंस आता फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमांतून समोर येत आहे. भूकंपातील हादऱ्यामध्ये अनेकांचे प्राण जाता-जाता वाचले आहेत. (Photo: Social Media/X)
-
रशियातल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ झालेल्या भयानक भूकंपानंतर काही वेळातच, रशियाच्या कुरिल बेटांच्या किनारी भागात आणि जपानच्या मोठ्या उत्तरेकडील बेट होक्काइडोला त्सुनामी आली आहे. (Photo: AP)
-
रशियाथ ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. रशियानंतर जपानच्या अनेक भागात त्सुनामीच्या लाटा उसळू लागल्या आहेत. (Photo: Reuters)
-
याशिवाय हवाई, अलास्का आणि कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यावरही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. (Photo: AP)
-
रशियातील भूकंपाच्या भयानक दृश्यांमध्ये बड्या इमारती उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. (Photo: Social Media/X)
-
जपानच्या हवामान संस्थेने सांगितले की, सुमारे ३० सेमी (सुमारे एक फूट) उंच असलेली पहिली त्सुनामीची लाट होक्काइडोच्या पूर्व किनाऱ्यावरील नेमुरो येथे पोहोचली. (Photo: AP)
-
भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये समुद्रात उंच लाटा उसळताना दिसत आहेत. (Photo: Reuters)
-
त्याच वेळी, पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटले आहे की भरती-ओहोटीमुळे हवाई, चिली, जपान आणि सोलोमन बेटांच्या काही किनारी भागात १ ते ३ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. (Photo: Reuters)
-
रशियामध्ये भूकंपानंतर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. वाहने जिथे होती तिथेच उभी असल्याचे दिसून आले. (Photo: Reuters)
-
तसेच, रशिया आणि इक्वेडोरच्या काही किनारी भागात ३ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळू शकतात. (Photo: Social Media/X)
-
रशियामध्ये भूकंपाचा फटका एका शाळेलाही बसला आहे. या शाळेचा काही भाग कोसळल्याचे पाहायला मिळते आहे. (Photo: Social Media/X)
-
रशियाच्या सुदूर पूर्वेकडील शक्तिशाली भूकंपानंतर जपानच्या काही भागांमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आल्यानंतर, उत्तर जपानमधील होक्काइडोमधील मुकावा शहरातील अग्निशमन केंद्राच्या छतावर लोक आश्रय घेत आहेत. (Photo: AP) हेही पाहा- Earthquake In Russia: काय आहे रिंग ऑफ फायर? रशियामधील सर्वात मोठ्या भूकंपानंतर पुन्हा चर्चेत…
Russia Earthquake: निसर्गाचा रुद्रावतार! रशियात शक्तिशाली भूकंप; जपानला त्सुनामीचा इशारा, पाहा फोटो
रशियामध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपाने मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपानंतर जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचे भयानक फोटो समोर आले आहेत.
Web Title: 8 8 earthquake near russia leads to tsunami in kamchatka alert in japan natures fury photos spl