-
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील घाट परिसराला पावसाने झोडपले आहे.
-
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे.
-
काल रात्रीपासून सिंहगड रोडवरील एकतानगरी सोसायटी परिसरात पाणी जमण्यास सुरुवात झाली होती.
-
त्या भागातील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
-
पण, पाणी सोसायट्यांमध्ये शिरल्याने सिंहगड रोडवरील एकतानगरी येथे पीएमसी अधिकाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करूनही त्यांनी स्थलांतर करण्यास नकार दिला.
-
बुधवारी धरणांमधून अधिक पाणी सोडण्यात आल्यामुळे सिंहगड रोडवरील बुडालेल्या एकतानगरीमध्ये पाणीच पाणी झाले आहे.
-
सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने पुराच्या पाण्यासह सरपटणाऱ्या प्राण्यांना रोखण्यासाठी सिंहगड रोडवरील एकतानगर येथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
-
मुठा नदी अगदी ओसंडून वाहत आहे.
-
पावसामुळे तेथील रहिवाशांना अशा सगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: Arul Horizon / Express photo)
मुसळधार पावसानं पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ, आजूबाजूच्या परिसरात शिरलं पाणी; पाहा फोटो
पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्यामुळे पुण्यातील नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. एकतानगरमधील नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले.
Web Title: Mansoon 2025 updates 20 august heavy rainfall in pune city sinhgad road lastest updates svk 05