• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pm modi china visit prime minister narendra modi receives warm welcome in china will participate in sco summit gkt

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चीनमध्ये जंगी स्वागत, SCO परिषदेत होणार सहभागी; पाहा फोटो!

PM Modi China Visit : पंतप्रधान मोदी SCO परिषदेसाठी ७ वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनमध्ये दाखल; कोणता मोठा निर्णय होणार? अवघ्या जगाचं लक्ष.

August 30, 2025 18:24 IST
Follow Us
  • PM Modi China Visit SCO Summit
    1/1

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चीनमधील तिआंजिन येथे आगमन झालं असून यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. (नरेंद्र मोदी सोशल मीडिया)

  • 2/1

    टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच चीन-आणि भारतामधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (फोटो-एएनआय)

  • 3/1

    तब्बल ७ वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीनमध्ये दाखल झाले आहेत. शांघाय सहकार्य संघटनेची ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी तिआंजिनमध्ये बैठक होत आहे. या बैठकीत मोदी सहभागी होणार आहेत.(फोटो-एएनआय)

  • 4/1

    शांघाय सहकार्य संघटनेची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी बैठक असून पंतप्रधान मोदी यांच्यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. (फोटो-एएनआय)

  • 5/1

    ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त टॅरिफ दरम्यान भारतासाठी पंतप्रधान मोदींचा हा चीन दौरा महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. (फोटो-एएनआय)

  • 6/1

    शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदे दरम्यान पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग आणि पुतिन यांच्यात महत्वाची बैठक होणार असून काही महत्वाचे निर्णय होणार आहेत. (फोटो-एएनआय)

  • 7/1

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या या भेटीमुळे भारताचे राष्ट्रीय हित तसेच प्रादेशिक आणि जागतिक शांतता, सुरक्षा आणि विकास बळकट होईल.(फोटो-एएनआय)

  • 8/1

    अमेरिका या एससीओ शिखर परिषदेवर लक्ष ठेऊन असेल. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५०% कर लादल्यानंतर भारत येथे चीन आणि आणखी काही देशांबरोबर मजबूत भागीदारी करू शकतो.(फोटो-एएनआय)

  • 9/1

    तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप अर्दोगन, इंडोनेशियाचे प्रबोवो सुबिआंतो, मलेशियाचे अन्वर इब्राहिम, व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन्ह, पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ, नेपाळचे के. पी. शर्मा ओली, मालदीवचे महंमद मुईझ्झू हे नेते बैठकीला उपस्थित राहतील.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 10/1

    शांघाय सहकार्य संघटनेत रशिया, भारत, इराण, कझाकस्तान, किरगिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, बेलारूस, चीन या देशांचा समावेश आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

TOPICS
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगChinese President XI Jinpingपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiशी जिनपिंगXI Jinping

Web Title: Pm modi china visit prime minister narendra modi receives warm welcome in china will participate in sco summit gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.