• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. shreemantdagdusheth halwai ganpati visarjan 2025 pune alka chowk photos viral svk

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला पुणेकरांची अलोट गर्दी, पाहा Photos

shreemant Dagdusheth Halwai Ganpati Visarjan 2025 : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुण्यातील मानाच्या दगडूशेठ गणपतींचं भावपूर्ण विसर्जन

Updated: September 7, 2025 12:15 IST
Follow Us
  • shreemantdagdusheth halwai ganpati visarjan 2025
    1/9

    पुण्यातील गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचा विसर्जन सोहळा शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पार पडला.  (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 2/9

    यंदा पहाटेपासूनच काही मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी निघाल्याने मिरवणुकीचा वेग तुलनेने वाढलेला दिसून आला.  (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 3/9

    सायंकाळी ५ च्या सुमारास विद्युत रोषणाईने सजवलेला दगडूशेठांचा रथ दर्शनासाठी दाखल झाला आणि भाविकांची उसळलेली गर्दी पाहण्यासारखी होती.  (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 4/9

    परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील मंदिरातून साडेचार वाजता मिरवणुकीची सुरुवात झाली.  (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 5/9

    अलका चौकात पोहोचताच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले.  (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 6/9

    आरती संपन्न होताच मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. येथेही दर्शनासाठी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.  (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 7/9

    निरोपाच्या क्षणी ‘मोरया मोरया’च्या घोषणांनी साऱ्या मिरवणुकीला वेगळाच जिवंतपणा दिला.  (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 8/9

    टिळक चौकात रात्री ८ च्या सुमारास गणेशमूर्ती पोहोचली, यावेळी पोलीस आयुक्तांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली.  (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 9/9

    अखेर दगडूशेठ गणपतींच्या विसर्जनाने पुण्याच्या विसर्जन सोहळ्याला पारंपरिक उत्साह व भक्तिभावाची सजावट लाभली.  (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)


    (हेही पाहा: Photos: ढोल-ताशांचा गजर, महिलांची फुगडी, भाविकांची गर्दी; पुण्यातील मानाचे गणपती विसर्जनाच्या मार्गावर )

TOPICS
गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Shreemantdagdusheth halwai ganpati visarjan 2025 pune alka chowk photos viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.