• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. decorations done at lord vitthal rakhumai temple pandharpur on the auspicious occasion sdn

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ! ऋतूचक्राप्रमाणे विठ्ठल-रुक्मिणीला फळाफुलांची आरास

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
    • जसजसा ऋतूचक्र बदलतो, त्यानुसार पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची सजावट करण्यात येते. प्रत्येक ऋतूचं महत्त्व या मंदिराच्या सजावटीतून दिसून येतं. २०२० या वर्षाच्या सुरुवातीपासून पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराचे ज्या-ज्या प्रकारे सजावट करण्यात आली, त्याची नयनरम्य दृश्ये पाहुयात आणि विठ्ठल-रखुमाईचं रुप डोळ्यांत साठवून घेऊयात.. (फोटो सौजन्य – मंदिर समिती)
    • 1/15

      नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक अशा ब्ल्यू डायमंड नावाच्या फुलांनी आरास केली. या फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले.

    • २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली.
    • 2/15

      २६ जानेवारी २०२० रोजी विठ्ठल रखुमाईचे साजिरे रूप.

    • 3/15

      महाशिवरात्री निमित्त महादेवाला प्रिय असलेल्या बेलाच्या पानांची आरास करण्यात आली. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे गर्भगृह, प्रवेशद्वार आदी ठिकाणी ही आरास केली गेली.

    • 4/15

      माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर आणि रुक्मिणीमाता मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.

    • 5/15

      चैत्र एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस १ लाख गुलाबाच्या फुलांची आरास केली.

    • 6/15

      गुढीपाडव्याच्या निमित्ताने चाफा,मोगरा, गुलाब आणि तुळस अशा १५० किलो फुलांची आरास या मंदिरात करण्यात आली होती.

    • 7/15

      सुंदर ते ध्यान उभे विटेवर…

    • 8/15

      वैशाख संकष्टी चतुर्थी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आंब्याची नेत्रदीपक आरास करण्यात आली होती.

    • 9/15

      लॉकडाउनच्या काळात विठ्ठल मंदिर भाविकांसाठी मंदिर बंद होते, तरीही आंब्याच्या मोसमात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीभोवती आंब्यांची सजावट करण्यात आली होती.

    • 10/15

      दशहराच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात द्राक्ष आणि द्राश्र वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली होती.

    • 11/15

      विठ्ठल रखुमाईला चंदनाच्या उटीचा साज

    • 12/15

      या विठूचा गजर हरीनामाचा…

    • 13/15

      करोना काळात साजरी होणारी ही पहिलीच आषाढी एकादशी.. या एकादशीला पंढरपूर भक्तांच्या गर्दीने फुलून जाणार नाही.. यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपुरात होणाऱ्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पुजेचा मान असणाऱ्या मानाच्या वारकऱ्याची निवड करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरात गेली सहा वर्षे सेवा करणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

TOPICS
आषाढी एकादशी २०२४Ashadhi Ekadashi 2024आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५

Web Title: Decorations done at lord vitthal rakhumai temple pandharpur on the auspicious occasion sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.