-
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी काही दिवसांपूर्वीच ऑकलंड येथील राधे-कृष्ण मंदिराला भेट दिली. जसिंडा यांच्या या भेटीचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायर होताना दिसत आहेत.
-
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जसिंडा अगदी मंदिरामध्ये प्रवेश करण्यापासूनची दृष्य दिसत आहेत. मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यामध्ये आलेल्या पंतप्रधाना जसिंडा बूट मंदिराबाहेर काढतानाही मंदिराच्या पदाधिकाऱ्यांशी गप्पा मारत होत्या.
-
मंदिराशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्यांना मंदिराच्या कारभाराची आणि मंदिरासंदर्भातील माहिती दिली. न्यूझीलंडमध्ये निवडणुकांच्या प्राचाराला लवकरच सुरुवात होणार असून येथे हिंदू मोठ्या संख्येने असल्याने पंतप्रधांनी एका कार्यक्रमानिमित्त या मंदिराला भेट देऊन प्राचारासाठी आशिर्वाद घेतल्याची चर्चा येथील हिंदू बांधवांमध्ये आहे.
-
खास हिंदू पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
-
जसिंडा यांनी पुष्पांजलीही वाहिली.
-
या कार्यक्रमाला न्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त मुक्तेश परदेशीही उपस्थित होते. (फोटो Twitter/indianweekender)
-
न्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त मुक्तेश परदेशी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या कार्यक्रमातील काही क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: Twitter/MukteshPardeshi)
-
पंतप्रधान जसिंडा आणि मुक्तेश परदेशी यांच्यामध्ये अनेक विषयांवर गप्पा झाल्या. (फोटो: Twitter/MukteshPardeshi)
-
हा कार्यक्रम ६ ऑगस्ट रोजी पार पडला. (फोटो: Twitter/MukteshPardeshi)
-
यावेळी पंतप्रधान जसिंडा यांनी खास भारतीय पद्धतीच्या शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतल्याचे मुक्तेश परदेशींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुरी, छोले आणि डाळ अशा महाप्रसादाचा लाभ पंतप्रधानांनी घेतला. (फोटो: Twitter/MukteshPardeshi)
न्यूझीलंडच्या पंतप्रधान हिंदू मंदिरात नतमस्तक, घेतला छोले-पुरीच्या महाप्रसादाचा आस्वाद
ऑकलंडमधील मंदिरामध्ये पंतप्रधानांनी घेतले देवाचे दर्शन
Web Title: New zealand pm jacinda ardern visits a temple in auckland scsg