• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 700 years old lord ganesha idol at the top of active volcano of mount bromo indonesia scsg

७०० वर्षांपासून ज्वालामुखीवर विराजमान झालेल्या गणपती बाप्पांची रंजक गोष्ट

ज्वालामुखीच्या अगदी तोंडाशी आहे ही गणेशमूर्ती

August 21, 2020 17:31 IST
Follow Us
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जाणार. करोना संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरी घरगुती गणेशोत्सवाचा उत्साही जराही कमी झालेला दिसत नाहीय. अनेक गणेश मंदिरांची सजावट करण्यात आली असून आता पुढील दहा दिवस रोज गणपतीची आरती आणि पूजेचे स्वर कानावर पडणार आहेत. मातर गणपतीची पूजा केवळ भारतातच होते असं नाही तर मुस्लीमबहुल देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  इंडोनेशियामध्येही गणेशाची अनेक मंदिरे आहेत. विशेष म्हणजे येथील एका गणेश मुर्ती चक्क ज्वालामुखीच्या तोंडाशी आहे. याचबद्दल आपण या गॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत.
    1/

    दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जाणार. करोना संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरी घरगुती गणेशोत्सवाचा उत्साही जराही कमी झालेला दिसत नाहीय. अनेक गणेश मंदिरांची सजावट करण्यात आली असून आता पुढील दहा दिवस रोज गणपतीची आरती आणि पूजेचे स्वर कानावर पडणार आहेत. मातर गणपतीची पूजा केवळ भारतातच होते असं नाही तर मुस्लीमबहुल देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  इंडोनेशियामध्येही गणेशाची अनेक मंदिरे आहेत. विशेष म्हणजे येथील एका गणेश मुर्ती चक्क ज्वालामुखीच्या तोंडाशी आहे. याचबद्दल आपण या गॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत.

  • 2/

    गणेशाची ही मूर्ती इंडोनेशियामधील सक्रिय ज्वालामुखी असणाऱ्या माउंट ब्रोमो येथे आहे. (फोटो सौजन्य : Twitter/mridulrajk यांच्या अकाउंटवरुन)

  • 3/

    स्थानिकांच्या सांगण्यानुसार ही मूर्ती ७०० वर्ष जुनी आहे. (फोटो सौजन्य : Twitter/AjaySha22728399 यांच्या अकाउंटवरुन)

  • 4/

    इंडोनेशियामध्ये १४१ ज्वालामुखींपैकी १३० ज्वालामुखी सक्रिय आहेत. त्यापैकीच एक असणाऱ्या माउंट ब्रोमोच्या शिखरावर ही मूर्ती विराजमान झाली आहे. हा ज्वालामुखी जावा प्रांतातील ब्रोमो टेंजर सेमेरु नॅशनल पार्कमध्ये आहे. (फोटो सौजन्य : Twitter/ Thevampireabhi यांच्या अकाउंटवरुन)

  • 5/

    जावानीज भाषेमध्ये ब्रोमोचा अर्थ ब्रम्ह असा होतो. मात्र या ज्वालामुखीवर विराजमान असलेल्या गणेशाला विशेष महत्व आहे. (फोटो सौजन्य : Twitter/IndiaTales7 यांच्या अकाउंटवरुन)

  • 6/

    ज्वालामुखीच्या अगदी तोंडाशी असणारी ही गणेशमूर्ती लोकांचे रक्षण करते अशी येथील स्थानिकांची मान्यता आहे.(फोटो सौजन्य : Twitter/IndiaTales7 यांच्या अकाउंटवरुन)

  • 7/

    जावा प्रांतातील टेंगरिजी जमातीच्या दंतकथेनुसार त्यांच्या पूर्वजांनी ही मुर्ती ज्वालामुखीच्या तोंडाशी स्थापन केली आहे. (फोटो सौजन्य : Twitter/ newassamtweets यांच्या अकाउंटवरुन)

  • 8/

    अगदी डोंगर चढून माथ्यावर गेल्यानंतर हा गणेशाचे दर्शन होत असले तरी येथील गणेशाच्या पूजेमध्ये कधीच खंड पडू दिला जात नाही. येथे विस्फोट झाला तरी गणेशाची पूजा केली जाते. (फोटो सौजन्य : Twitter/ImNavPrabhat यांच्या अकाउंटवरुन)

  • 9/

    या गणेशाचा एक छोटा उत्सवही दरवर्षी साजरा केला जातो. खरं तर ही  स्थानिकांमधील एक परंपरा आहे. या उत्सवाला 'याद्रया कासडा' असं म्हणतात. १५ दिवसांचा हा उत्सव या ठिकाणी मुर्ती स्थापन केल्यापासून सुरु असल्याचे सांगितले जाते. (फोटो सौजन्य : Twitter/KaduAmol यांच्या अकाउंटवरुन)

  • 10/

    या गणेशाची पूजा कऱण्याबरोबरच त्याला फळं, फुलांचा नैवद्यही दाखवला जातो. तसेच येथे देवाला बकऱ्याचा बळी देण्याचीही परंपरा आहे. (फोटो सौजन्य : Twitter/ModakSamprati यांच्या अकाउंटवरुन)

  • 11/

    बळी दिला नाही तर ज्वालामुखीचा प्रकोप होईल आणि सर्व लोक त्यामध्ये भस्म होतील अशी येथील स्थानिकांची मान्यता आहे. (फोटो सौजन्य : Twitter/ Thevampireabhi यांच्या अकाउंटवरुन)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: 700 years old lord ganesha idol at the top of active volcano of mount bromo indonesia scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.