• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. birthday special president of india ram nath kovinds journey from lawyer to president scsg

Birthday Special: वडील चालवायचे किराणा मालाचे दुकान; मुलगा झाला राष्ट्रपती, कोविंद यांचा थक्क करणारा प्रवास

रामनाथ कोविंद यांचा जन्म कानपूरच्या पाराऊख गावात झाला

October 1, 2020 09:00 IST
Follow Us
  • भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज वाढदिवस. कानपूरमधील पाराऊख गावातून सुरु झालेला कोविंद यांचा प्रवास २०१७ साली थेट राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत यूपीएच्या मीरा कुमार यांचा पराभव करत कोविंद हे देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती ठरले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या याच प्रवासासंदर्भात जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो पीटीआय आणि रॉयटर्सवरुन साभार)
    1/

    भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज वाढदिवस. कानपूरमधील पाराऊख गावातून सुरु झालेला कोविंद यांचा प्रवास २०१७ साली थेट राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत यूपीएच्या मीरा कुमार यांचा पराभव करत कोविंद हे देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती ठरले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या याच प्रवासासंदर्भात जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो पीटीआय आणि रॉयटर्सवरुन साभार)

  • 2/

    २०१७ साली जुलै महिन्यात झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत यूपीएच्या मीरा कुमार यांचा पराभव केला आणि दुसरे दलित राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला.

  • 3/

    रामनाथ कोविंद यांचे वडिल मैकूलाल पाराऊख गावचे सरपंच होते. यासोबतच रामनाथ यांचे वडिल मैकूलाल गावात किराणा मालाचे आणि कपड्याचे दुकान चालवायचे. परिस्थितीशी संघर्ष करत रामनाथ कोविंद यांनी शिक्षण घेतले.

  • 4/

    रामनाथ कोविंद यांचे भाऊ प्यारेलाल सांगतात, "आम्ही एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे जीवन जगत होतो. कुटुंबीयांनी सर्व सात भावंडांना शिक्षण दिले. यामध्ये पाच भाऊ आणि दोन बहिणींचा समावेश होता. यामधील एक भाऊ मध्य प्रदेशातून अकाऊंट पदावरुन निवृत्त झाले. तर आणखी एक भाऊ शाळेत शिक्षक आहे."

  • 5/

    रामनाथ कोविंद वकील झाले. बाकी सगळे आज आपापला व्यवसाय सांभाळत आहेत, असंही कोविंद यांचे भाऊ प्यारेलाल यांनी सांगितलं.

  • 6/

    रामनाथ कोविंद यांचे सुरुवातीचे शिक्षण स्थानिक शाळेत झाले. कानपूर ग्रामीण भागातील खानपूरमधून कोविंद यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले.

  • 7/

    यानंतर उच्च शिक्षणासाठी कोविंद कानपूर शहरात गेले. कानपूर विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य आणि विधीचे शिक्षण घेतले.

  • 8/

    वकिलीचे शिक्षण घेतल्यावर कोविंद यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेले. दिल्लीत त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरु केली.

  • 9/

    केंद्रात जनता पक्षाचे सरकार आल्यावर आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर कोविंद देसाई यांचे खासगी सचिव झाले.

  • 10/

    जनता पक्षापासून भारतीय जनसंघ वेगळा झाला आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. जनता सरकार कोसळल्यावर १९८० ते १९८३ या कालावधीत केंद्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील स्थायी परिषदेत कोविंद यांचा समावेश होता.

  • 11/

    कोविंद यांनी १९९३ पर्यंत दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली.

  • 12/

    कोविंद यांनी जवळपास १६ वर्षे त्यांनी वकील म्हणून काम केले.

  • 13/

    दिल्लीत असताना त्यांची जनसंघाचे नेते हुकुमचंद यांच्यासोबत ओळख झाली. यामुळे कोविंद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी जोडले गेले.

  • 14/

    १९९१ मध्ये भाजपने घाटमपूर लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिल्यावर रामनाथ कोविंद सक्रीय राजकारणात झाले. मात्र या निवडणुकीत कोविंद यांचा पराभव झाला.

  • 15/

    लोकसभा निवडणुकीत जरी कोविंद यांचा पराभव झाला असला तरी पक्षाने अवघ्या वर्षभरातच त्यांच्याकडे राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमातीच्या मोर्चाचे अध्यक्षपद दिले.

  • 16/

    महामंत्री, प्रवक्ते अशी पदे देऊन भाजपने कायमच कोविंद यांच्यावर विश्वास दाखवला.

  • 17/

    १९९४ मध्ये कोविंद यांनी राज्यसभेवर पाठवण्यात आले. कोविंद यांना भाजपने दोनदा राज्यसभेवर संधी दिली.

  • 18/

    यानंतर कोविंद यांच्याकडे बिहारचे राज्यपालपद देण्यात आले आणि त्यानंतर त्यांना थेट देशाच्या राष्ट्रपतिपदी विराजमान होण्याची संधी पक्षाकडून देण्यात आली.

Web Title: Birthday special president of india ram nath kovinds journey from lawyer to president scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.