• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. coronavirus serum institute of india ceo adar poonawalla rents uk mansion for huge amount sgy

सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी ब्रिटनमध्ये घेतला आलिशान बंगला; एका दिवसाचं भाडं ऐकून थक्क व्हाल

अदर पूनावाला यांनी ब्रिटनमधील Mayfair येथे एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • जगातील सर्वात मोठी करोना लस निर्मिती कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला करोनाच्या संकटात नेहमीच चर्चेत राहिले आहेत. संग्रहित ((Photo: adarpoonawalla.com)
    1/15

    जगातील सर्वात मोठी करोना लस निर्मिती कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला करोनाच्या संकटात नेहमीच चर्चेत राहिले आहेत. संग्रहित ((Photo: adarpoonawalla.com)

  • 2/15

    आपल्या साध्या आणि सरळ स्वभावासाठी ओळखले जाणारे अदर पूनावाला यांची लाईफस्टाइल मात्र अनेकांना हेवा वाटावी अशीच आहे.

  • नुकतंच अदर पूनावाला यांनी ब्रिटनमधील Mayfair येथे एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे. (Photo: adarpoonawalla.com)
  • या बंगल्यासाठी अदर पूनावाला एका आठवड्यासाठी तब्बल ५० लाख रुपये मोजत आहेत. (Photo: adarpoonawalla.com)
  • 3/15

    ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, अदर पूनावाला यांनी पोलंडचे अब्जाधीश उद्योगपती डोमिनिका कलजिक यांच्याकडून हा बंगला भाड्याने घेतला आहे.

  • 4/15

    ब्रिटनमधील सर्वात मोठ्या घरांपैकी एक असणारं हे घर जवळपास २५ हजार फुटांच्या परिसरात आहे.

  • ब्रिटनमधील जवळपास २४ घरं या जागेवर सामावतील इतका परिसर मोठा आहे. (Photo: adarpoonawalla.com)
  • 5/15

    (संग्रहित छायाचित्र)

  • 6/15

    सीरमच्या प्रवक्त्यांनी अदर पूनावाला यांच्या वतीने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. याशिवाय डोमिनिका यांच्या प्रवक्त्यांनीही कोणतीही माहिती दिलेली नाही.

  • अदर पूनावाला यांनी केलेल्या या व्यवहारामुळे सेंट्रल लंडनमधील आलिशान घरांच्या मार्केटला फायदा होईल असं सांगितलं जात आहे. (Photo: adarpoonawalla.com)
  • 7/15

    ब्रेक्झिट आणि नंतर करोना महामारीमुळे मार्केटला मोठा फटका बसला आहे. प्रॉपर्टी डाटा कंपनी LonRes यांच्यानुसार, Mayfair मध्ये दर गेल्या पाच वर्षात ९.२ टक्क्यांनी घसरले आहेत.

  • 8/15

    अदर पूनावाला आणि लंडन यांचं आधीपासूनचं नातं आहे. अदर पूनावाला यांनी लंडनच्या वेस्टमिंस्टर युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं आहे.

  • २०१७ मध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत अदर पूनावाला यांनी ब्रिटनमध्ये आपलं घर असावं अशी इच्छा व्यक्त केली होती. (Photo: adarpoonawalla.com)
  • अदर पूनावाला जगातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहेत. लसनिर्मितीमधूनच त्यांनी संपत्तीचा मोठा भाग उभारल्याचं सांगितलं जातं. (Photo: Twitter)
  • सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस कोव्हिशिल्डची निर्मिती करत आहे. विशेष म्हणजे ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. आपल्या या कार्याबद्दल अदर पूनावाला यांचं जगभरातून कौतुक होत आहे. (Photo: Twitter)

Web Title: Coronavirus serum institute of india ceo adar poonawalla rents uk mansion for huge amount sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.