-
सोशल मीडियावर सध्या गुजरातमधील नमो ऑक्सिजन बुस्टरचे फोटो व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)
-
या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे फोटो असणारे स्टीकर्स या करोनाच्या पार्श्वभूमीवर वाटप करण्यात आलेल्या साहित्यावर लावल्याचं दिसत आहेत.
-
यावरुन भाजपा समर्थकांवर आणि भाजापावर टीका केली जात आहे.
-
व्हॉट्सअपवरील माहितीवरुन कापूर, ओवा आणि लवंग असणारा हा प्रोडक्ट बनवल्याची टीका एकाने केलीय.
-
राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे कार्यकर्ते ही पाकिटं वाटत असल्याचं एकाने म्हटलं आहे.
-
हे फक्त इमेज ब्रॅम्डींग आहे.
-
बरं झालं सांगितलं नाकाने वास घ्यायचा आहे, असा खोचक टोला एकाने लगावलाय.
-
काहींनी अमेरिकेने भारताला पाठवलेल्या करोना मदत सामुग्रीचा फोटो आणि हा नमो बुस्टरचा फोटो बाजूबाजूला लावून अमेरिकेने यांच्याकडून जाहीरातबाजी शिकण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
-
ज्या राधे राधे ग्रुपच्या नावाने ही पाकिटं वाटण्यात आली आहेत तो ग्रुप सूरतमधील परबतपाटीया येथील नगरसेवक असणारे दिनेश राजपुरोहित चालवतात.
-
"आम्ही भाजपाचे सेवक आहोत आणि आम्हाला ज्यांच्याकडून करोनाविरुद्धची लढाईत काम करण्याची प्रेरणा मिळते त्यांचे फोटो आम्ही छापलेत," असं दिनेश यांनी सांगितलं.
Photos: ऑक्सिजन वाढवण्याचा गुजरात पॅटर्न; ‘नमो ऑक्सिजन बुस्टर’वरुन भाजपा ट्रोल
‘नमो ऑक्सिजन बुस्टर’वर मोदींचा फोटो का छापण्यात आलाय यासंदर्भात स्पष्टीकरणही देण्यात आलंय
Web Title: Namo oxygen booster goes viral on social media scsg