• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. cow dung and cow urine cover and bath with milk gujrat men trying this as immunity booster treatment against covid 19 scsg

Photos: आधी शेण, गोमूत्राचा लेप… नंतर दूध, ताकाने आंघोळ; गुजरातमधील ‘इम्यूनिटी बुस्टींग’ चर्चेत

..पण खरोखर याचा फायदा होतो का?, जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात

May 14, 2021 17:46 IST
Follow Us
  • करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गायीच्या शेणाच्या वापर करण्यासंदर्भातील दावे खोटे असून यासंदर्भातील इशारा डॉक्टरांनी दिला आहे. गायीचं शेण हे करोनाचा संसर्ग होण्यापासून एखाद्या व्यक्तीला वाचवू शकतं यासंदर्भातील कोणाताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. (फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि फाइल फोटो)
    1/13

    करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गायीच्या शेणाच्या वापर करण्यासंदर्भातील दावे खोटे असून यासंदर्भातील इशारा डॉक्टरांनी दिला आहे. गायीचं शेण हे करोनाचा संसर्ग होण्यापासून एखाद्या व्यक्तीला वाचवू शकतं यासंदर्भातील कोणाताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. (फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि फाइल फोटो)

  • 2/13

    रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार करोनाच्या भितीने गायीच्या शेणाचा वापर करण्याच्या नादात इतर आजारांना आमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • 3/13

    करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भरताला बसला आहे. दोन कोटींहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली असून करोनामुळे मरण पावणाऱ्यांची एकूण संख्या अडीच लाखांच्या आसपास पोहचली आहे. मात्र या संख्येपेक्षा करोनाची बाधा झालेल्यांची खरी संख्या ही पाच त दहा पट अधिक असू शकते असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

  • 4/13

    भारतामध्ये ऑक्सिजन बेड्स, औषधांचा तुटवडा जाणवत असून रुग्णांना दाखल करण्यासाठी आणि आरोग्य सुविधांसाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत असल्याचं चित्र दिसत आहे.

  • 5/13

    रुग्णांना दाखल करण्यासाठी लागणारा वेळ, अपुऱ्या आरोग्य सुविधा यामुळे काही राज्यांमध्ये उपचाराआधीच रुग्णांचा मृत्यू होत आहे.

  • 6/13

    करोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्यासंदर्भातील भितीमुळे लोक वेगवेगळे उपाय करुन करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. गुजरातमधील काही ठिकाणी आठवड्यातून एकदा गायीच्या शेणाचा लेप अंगावर लावल्याने करोनाची बाधा होत नाही असा समज असल्याने अनेकजण गायीचं शेण अंगाला लावून घेताना दिसत आहेत. तसेच गोमूत्र प्यायलायने रोगप्रतिकारशक्ती वाढते या समजुतीमधून करोनाची बाधा होऊ नये तसेच झाली तर त्यावर मात करण्यासाठी गोमूत्र सेवन करणाऱ्यांचे प्रमाणही बरेच आहे.

  • 7/13

    हिंदू धर्मामध्ये गाय पवित्र मानली जाते. गाय ही जीवन आणि पृथ्वीचं प्रतिक असून गायीचं शेणं हे ग्रामीण भागामध्ये घरं सारवण्यासाठी, धार्मिक विधींसाठी, सरपण म्हणून गोवऱ्यांच्या स्वरुपात वापरले जाते.

  • 8/13

    शेणामधील गुणधर्म हे आरोग्यासाठी फायद्याचे असतात असं मानलं जात असल्याने ते वापरलं जातं.

  • 9/13

    करोनावर मात केल्यानंतर शेणाचा लेप लावून करण्यात येणारे उपचार घेण्यासाठी गौतम बोरीसा नियमितपणे श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्यालय प्रतिष्ठानममध्ये येतात. करोनावर लस बनवणाऱ्या झायडू कॅडिला या कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्यालय प्रतिष्ठानमध्ये शेणाचा लेप लावून रोगप्रितकारशक्ती वाढवण्याचे उपचार करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं.

  • 10/13

    "येथे डॉक्टर्स सुद्धा उपचार घेण्यासाठी येतात. या थेरिपीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे ते न घाबरता आपल्या रुग्णांजवळ जाऊ शकतात," असं गौतम बोरीसा यांनी रॉयटर्सला सांगितलं. गौतम हे एका औषध कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. मागील वर्षी करोनामधून बरं होण्यासाठी आपण शेणाचा लेप लावण्याचा उपाय केल्याचं गौतम सांगतात.

  • 11/13

    श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्यालय प्रतिष्ठानमध्ये अंगावर गायीच्या शेणाचं आणि गोमूत्राचं मिश्रण लावल्यानंतर ते संपूर्णपणे सुकल्यानंतर गायींचं दर्शन घेऊन योगा केला जातो. त्यानंतर दूध आणि ताकाने अंगावरील शेणाचा लेप काढला जातो.

  • 12/13

    मात्र अशापद्धतीने गायीच्या शेणाचा वापर करणे हे करोनावरील उपचारांचा भाग नाहीय, असं भारतासहीत जगभरातील डॉक्टर्सने यापूर्वीच सांगितलं आहे. अशाप्रकारच्या उपचारांमुळे आजारांपासून आपण सुरक्षित आहोत असा समज निर्माण होऊन, इतर आजारांनाही आमंत्रण दिल्यासारखं होईल असं डॉक्टर सांगतात.

  • 13/13

    "करोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गायीचं शेणं किंवा गौमुत्र फायद्याचं असतं असं दर्शवणारा एकही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाहीय," असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या डॉ. जी. ए. जयलाल यांनी सांगितलं आहे. "अशापद्धतीच्या वस्तूंचं सेवन केल्याने नवीन आजारांना आमंत्रण दिलं जातं. या माध्यमातून प्राण्यांमधून मानवाला पसरणारे रोग होऊ शकतात," असा इशाराही जयलाल यांनी दिलाय.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Cow dung and cow urine cover and bath with milk gujrat men trying this as immunity booster treatment against covid 19 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.