• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. international yoga day 2021 from goat yoga to beer yoga strange type of yoga abn

International Yoga Day 2021 : बिअरपासून बकऱ्यांसोबत योग; जाणून घ्या परदेशातील लोकप्रिय योगाचे विचित्र ट्रेंड

जगभरात फ्यूजन योगाचा उदय झाला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनी काही विचित्र ट्रेंड्स बद्दल माहिती घेऊया

June 21, 2021 10:54 IST
Follow Us
  • योग हा भारताच्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे. वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या सर्व संशोधनाच्या आधारे हे देखील सिद्ध झाले आहे की नियमितपणे योग केल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले आरोग्य मिळते. आता आधुनिक काळाचा विचार करता योगामध्ये बऱ्याच प्रकारचे ट्रेंड आले आहेत, जे परदेशात खूप लोकप्रिय होत आहेत. ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जाणून घ्या परदेशातील लोकप्रिय योगप्रकारांविषयी.
    1/6

    योग हा भारताच्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे. वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या सर्व संशोधनाच्या आधारे हे देखील सिद्ध झाले आहे की नियमितपणे योग केल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले आरोग्य मिळते. आता आधुनिक काळाचा विचार करता योगामध्ये बऱ्याच प्रकारचे ट्रेंड आले आहेत, जे परदेशात खूप लोकप्रिय होत आहेत. ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जाणून घ्या परदेशातील लोकप्रिय योगप्रकारांविषयी.

  • 2/6

    गोट योग (Got Yoga) गोट योग हा प्रकार उदासीनता आणि तणाव कमी करण्याचा योग मानला जातो. याचा शोध अमेरिकेतील शेतकरी लेनी मोर्स यांनी लावला. शेळीसोबत हा योगप्रकार केला जातो. अमेरिकेत लोकप्रिय झाल्यानंतर आता ब्रिटनमध्येही शेळीसोबतचा हा योग खूप पसंत केला जात आहे. (सौजन्य: इन्स्टाग्राम / लॅनी मोर्स फिचर)

  • बिअर योग (Beer yoga) ज्यांना बिअर पिण्याची आवड आहे, परंतु शरीराकडे लक्ष देता नाही त्यांच्यासाठी, बिअर योगाचा ट्रेंड सुरू झाला होता, जो आता परदेशातील लोकांचा खूप आवडता आहे. बिअर योगाची सुरुवात २०१६ मध्ये बर्लिनमधील योग प्रशिक्षक एमिली आणि झुला यांनी केली होती. हा योग थोडे मद्यपान केल्यानंतर सुरू केला जातो. याशिवाय बिअरची बाटली काही योगप्रकारांमध्ये वापरली जाते.
  • अॅक्रो योग (Acro Yoga) हा योग आपल्या जोडीदारासह केला जातो. यामुळे शरीर चपळ आणि लवचिक होते, तसेच शरीरामध्ये संतुलन तयार करण्यात मदत करते. या योगामुळे जोडीदाराशी असलेले आपले संबंधही सुधारतात. यात श्वास घेणे आणि श्वास बाहेर सोडणे आणि शरीरावर ताण देण्याचे चक्र सतत सुरु असते. अॅक्रो योग हा एक अतिशय कठीण योग मानला जातो. (सौजन्य- बिपाशा बासू इन्स्टाग्राम)
  • इक्वेस्ट्रियन योगा (Equestrian Yoga) इक्वेस्ट्रियन योगामध्ये घोडेस्वार आपल्या घोड्यासोबत योगाचे प्रकार करतो. घोडेस्वारी करताना लवचिकता आणि संतुलन सुधारण्यासाठी हा योगा केला जातो. (सौजन्य: Horse Yoga Girl/Facebook)
  • डोगा (Doga) डोगा हा पाळीव कुत्र्यांसोबत व्यायाम करण्याचा योगाचा प्रकार आहे. या योगा प्रकाराची सुरुवात २००३ मध्ये अमेरिकेत झाली. एका वर्षानंतर ब्रिटनमध्ये याची सुरुवात झाली आणि २०११ पर्यंत ते पाश्चात्य जगात पोहोचला. (सौजन्य: NAT Geo Wild/YouTube)
TOPICS
आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५International Yoga Day 2025योगाYogaयोगा डे २०२५Yoga Day 2025

Web Title: International yoga day 2021 from goat yoga to beer yoga strange type of yoga abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.