-
बुधवारी (२३ जुलै २०२१ रोजी) व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस लोकांना भेटत होते. त्याच दरम्यान तिथे अचानक स्पायडरमॅन पोहचला. हो खरोखरच. स्पायडरमॅन पोपला भेटण्यासाठी आला होता. (सर्व फोटो : AP Photo/Andrew Medichini)
-
आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे. तर एक व्यक्ती स्पायडरमॅनच्या वेशात पोपला भेटायला आली होती. स्पायडरमॅन पोपला भेटण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून या दोघांभोवती लोकांची गर्दीही जमली.
-
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जी व्यक्ती स्पायडरमॅनचा पोशाख करुन आली होती तिचं नाव मैटियो विलरडिटा असं होतं. मैटियो हा अनेकदा अशाप्रकारे स्पायडरमॅनचा पोशाख घालून रुग्णालयांमधील लहान मुलांना भेटण्यासाठी जातो. तो तिथे जाऊन मुलांचं मनोरंजन करतो.
-
पोप फ्रान्सिसला भेटल्यानंतर मैटियोने प्रतिक्रियाही दिली. मी पोपकडे अशी विनंती केली की त्यांनी आजारी मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी प्रार्थना करावी. "या भेटीमुळे मला फार उत्साह आला आहे. त्यांनी मला पाहता मी हे का करतोय हे ओळखलं," असंही मैटियोने सांगितलं.
-
मैटियो जेव्हा कोर्टयार्डमधील दर्शक म्हणजेच पोप ज्यांना भेटतात त्या लोकांमध्ये पोहचला तेव्हा अनेकांनी त्याच्याबरोबर फोटो काढले. इटलीमध्ये करोनामुळे बराच काळ लॉकडाउन होता. या कालावधीमध्ये मैटियोने १४०० व्हिडीओ कॉल करुन आजारी मुलांचं मनोरंजन केलं.
पोप फ्रान्सिससमोर स्पायडरमॅन आला अन्… : कारण वाचल्यावर तुम्हालाही वाटेल ‘स्पायडरमॅन’चा अभिमान
व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस लोकांना भेटत होते. त्याच दरम्यान तिथे अचानक स्पायडरमॅन पोहचला आणि त्याने पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली
Web Title: Spider man meets pope francis at vatican city scsg