Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. social media day indian people who got famous overnight because of social media scsg

Social Media Day: चहा, अश्लील गाणं ते डान्स… रातोरात स्टार झालेले सर्वसामान्य भारतीय

सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आज अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे देशातच नाही तर जगभरात चर्चेत असणाऱ्या अशाच काही चेहऱ्यांबद्दल…

June 30, 2021 08:19 IST
Follow Us
  • social media day
    1/11

    सध्याच्या काळातलं सोशल मीडिया हे प्रभावी साधन झालं असून एका लहानशा गोष्टीला प्रकाशझोतात आणण्याचं काम या मार्फत होताना दिसतं. या मीडियाच्या माध्यमातूनच आज अनेक व्यक्तींना प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. आजच्या जागतिक सोशल मीडिया डेनिमित्त (Social Media Day) आपण अशाच काही भारतीयांबद्दल जाणून घेणार आहोत जे सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झालेत.

  • 2/11

    प्रिया वारियार – नजरेच्या बाणांनी सगळ्यांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वारियार अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री आणि मॉडेल असलेली प्रियाने ‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातील एका २८ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिप ट्रेलरमध्ये तिने केलेल्या डोळ्यांच्या हरकतींमुळे ती प्रकाशझोतात आली.

  • 3/11

    प्रियाच्या या व्हिडिओला १ कोटी हिट्स मिळाले होते. त्यामुळे काही तासांच्या कालावधीतच ती गुगलवर सर्वाधिक शोधलेली व्यक्तींपैकी एक ठरली.

  • 4/11

    संजीव श्रीवास्तव – गोविंदा आणि मिथुन स्टाईल डान्स करुन सोशल मीडियावर सगळ्यांची मने जिंकणारे डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव ‘आप के आ जानेसे’ या गाण्यावर डान्स केल्यानंतर नावारुपाला आले.

  • 5/11

    संजीव श्रीवास्तव यांना व्हायरल व्हिडीओमुळे एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये गोविंदाबरोबर स्टेजवर नाचण्याची संधीही मिळाली. त्यांची लोकप्रियता पाहता त्यांना आता विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून निवडले गेले.

  • 6/11

    सोमवती महावर – सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. मध्यंतरी ‘हाय फ्रेंड चाय पिलो’ हा मजेशीर व्हिडिओ चांगलाच गाजला होता.

  • 7/11

    या व्हिडिओच्या माध्यमातून सोमवती महावर रातोरात स्टार झाली. अनेकांनी तर सोमवती महावरचा हा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस म्हणून ठेवला होता.

  • 8/11

    पूजा जैन – दिल्लीच्या रस्त्यांवर बाईक घेऊन फिरणाऱ्या पुजा जैन ही ढिंचँक पुजा नावाने सर्वत्र ओळखली जाते. ‘स्वॅग वाली टोपी’, ‘दारू’, ‘सेल्फी मेने लेली’ अशी अनेक गाणी तिने लिहिली व गायली आहेत.

  • 9/11

    यूटय़ूबवर तिच्या गाण्यांना लाखो हिट्स मिळाल्या आहेत. ‘सेल्फी मेने लेली’ आणि ‘दिलो का शूटर’ या तिच्या गाण्यामुळे ती जास्त चर्चेत आली. यमक जुळवून आचरट गाणी तयार करणारी ही ढिंचँक पूजा समाजमाध्यमांवर टिकेचा विषयही झाली होती.

  • 10/11

    ओमप्रकाश मिश्रा – सर्वसामान्य घरात जन्माला आलेला ओमप्रकाश मिश्रा ‘बोल ना आंटी आऊ क्या?’ या गाण्यामुळे प्रकाशझोतात आल्याचं पाहायला मिळतं. ओमप्रकाशने बोल ना आंटी आऊ क्या?’ या अश्लील गाण्याची निर्मिती करून ते युट्यूबवर अपलोडही केलं होतं.

  • 11/11

    ढिंच्याक पूजानंतर ओमप्रकाश मिश्रा सोशल मीडियाची नवी डोकेदुखी ठरला होता. ओमप्रकाशच्या व्हिडिओला युट्यूबवर लाखोंच्या संख्येने व्ह्यूजही मिळाल्यामुळे कोणाच्याही ध्यानीमनी नसलेला हा ओमप्रकाश चर्चेत आला. (सर्व फोटो व्हायरल व्हिडीओवरुन तसेच द इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)

TOPICS
सोशल मीडियाSocial Mediaसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Social media day indian people who got famous overnight because of social media scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.