-
आज आहे ६ जुलै म्हणजेच आंतरराष्ट्रीय किसिंग डे. अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किसचा म्हणजेच चुंबनाचा वापर करतात. अगदी हातावर किस करण्यापासून ते कपाळावर आणि माथ्यावर किस करुन आपले प्रेम व्यक्त केलं जातं. मात्र प्रेम व्यक्त करण्याबरोबरच किस करण्याचे अनेक फायदे आहेत असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्य वाटेल. याचसंदर्भात आपण या खास गॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
-
एका संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की रोमॅन्टीक किस केल्यास २ ते ३ कॅलरीज आणि इमोशनल किस केल्यास ५ कॅलरीज बर्न होतात. त्यामुळेच जितका दिर्घकाळ किस कराल तितक्या अधिक कॅलरी बर्न होतील असं सांगितलं जातं. म्हणजेच पर्यायाने वजन कमी होतं.
-
किस केल्याने शरीरामधील ऑक्सीटोसीनचं प्रमाण वाढतं. हे संप्रेरक शरीराला आराम देणाऱ्या संप्रेरकांपैकी महत्वाचे संप्रेरक आहे. या संप्रेरकाच्या उत्सर्जनामुळे आनंदाची भावना निर्माण होते. एकंदरितच यामुळे व्यक्तीला रिलॅक्स आणि आनंदी वाटू लागते.
-
किस केल्याने शरीरामध्ये रासायनिक बदल होतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
-
किस केल्याने पुरुषाच्या शरीरामधून टेस्टेस्टेरॉनसारखी संप्रेरक तयार होतात. ही संप्रेरक शरीरसंबंध ठेवताना स्त्रीच्या शरीरामध्ये जातात. यामुळे महिला पुरुषाकडे अधिक आर्षित होते आणि शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा निर्माण होते. त्याचप्रमाणे यामुळेच अॅड्रेनेलाइन संप्रेरक रक्तामध्ये मिसळते.
-
इमोशनल किस वाद संपवण्यासाठी फायद्याचा ठरतो असं नातेसंबंधांसंदर्भातील तज्ज्ञ सांगतात. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी किस हा उत्तम पर्याय आहे.
-
किस केल्याने जी संप्रेरक शरीरामध्ये निर्माण होतात त्यामुळे अस्वस्थतेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
-
किस केल्यामुळे शरीरातील लव्ह हार्मोन म्हणजेच ऑक्सिटोसीनचे शरीरामधील प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर रिलॅक्स होतं. त्याचवेळी शरीरामध्ये अॅड्रेनेलाइन संप्रेरकचं उत्सर्जन होतं. या संप्रेरकामुळे हृदयापासून रक्त शरीरभर फिरण्यासाठी म्हणजेच रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी मदत होते.
-
किस केल्याने आनंद मिळतो. मात्र यामागे कारण काय असेल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? किस करताना मेंदूमध्ये काही संप्रेरकांचे उत्सर्जन होतं. त्या संप्रेरकांमुळेच आनंद असल्याची भावना निर्माण होते. यामध्ये ऑक्सीटोसीन, डोपामाइन, सिरोटोनाइनसारख्या संप्रेरकांचा समावेश असतो.
-
चेहऱ्याचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी चेहऱ्याचा व्यायाम करणं गरजेचं असतं. किस करताना चेहऱ्यावरील ३० स्नायूंची हलचाल होते. यामुळे गालांचे सौंदर्य वाढण्यास मदत होतं.
International Kissing Day 2021: वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत; जाणून घ्या Kiss करण्याचे १० फायदे
अगदी हातावर किस करण्यापासून ते कपाळावर आणि माथ्यावर किस करुन आपले प्रेम व्यक्त केलं जातं. मात्र प्रेम व्यक्त करण्याबरोबरच किस करण्याचे अनेक फायदे आहेत
Web Title: International kissing day 2021 top 10 scientific health benefits of kissing scsg