-
चॉकलेट म्हणजे अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ. चॉकलेटचं साधं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. सध्या बाजारात विविध प्रकारचे, आकाराचे चॉकलेट मिळतात. त्यात सुद्धा डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट असे एक ना अनेक प्रकार आहेत.
-
चॉकलेटच्या याच नव्या रंगरुपामुळे लहान-थोर सारेच त्याच्या मोहात पडतात. परंतु चॉकलेट केवळ खाण्यासाठी नसून त्याचे काही गुणधर्मही आहेत जे शरीरासाठी गुणकारी ठरतात. मात्र हे फायदे आपल्याला ठाऊक नाहीत.
-
कोणत्याही पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचा दुष्परिणाम होणारच मात्र योग्य प्रमाणात त्याचे सेवन केले तर तो गुणकारी ठरु शकतो. याप्रमाणेच चॉकलेटचे योग्य प्रमाणात सेवन केले तर तुमची स्मरणशक्ती बळकट होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात याच चॉकलेटच्या फायद्यांबद्दल…
-
१. चॉकलेटमध्ये कोको बीन हा मुख्य घटक असून यामध्ये असलेल्या फ्लावनोल्समध्ये शरीरातील पेशींचे संरक्षण करण्य़ाची क्षमता असते. फ्लावनोल्स या घटकामुळे वयस्कर व्यक्तींची आकलन क्षमता, स्मरणशक्ती यांच्या कार्यामध्ये सुधारणा घडविण्यासाठी मदत होते.
-
२. उतारवयात चेह-यावर सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज होणे यासारखे शारीरिक बदल होत असतात. मात्र चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेटचे सेवन जरुर करावे.
-
३. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेट बाथ, फेशियल, पॅक आणि व्हॅक्स यासारखे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
-
४. नैराश्यग्रस्त असताना चॉकलेट खाल्ल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या काळामध्ये चॉकलेट खाणे कधीही उत्तम.
-
५. अचानक रक्तदाब कमी झाल्यावर चॉकलेट खाल्ले तर तत्काळ रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो.
-
६. आजकाल अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आढळून येते. शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि त्यामुळे होणा-या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी चॉकलेट उपयुक्त ठरते.
-
चॉकलेट ब्राऊनी, चॉकलेट पोपसिकल्स, टी केक्स, कप केक्स आणि मफीन्स अशा वेगवेगळ्या पद्धतीचे चॉकलेट प्रमाणात खाणे कायमच फायद्याचे ठरते.
World Chocolate Day: कोलेस्ट्रॉल नियंत्रणापासून ते स्मरणशक्ती वाढवण्यापर्यंत; जाणून घ्या चॉकलेट खाण्याचे फायदे
चॉकलेटचे योग्य प्रमाणात सेवन केलं तर तुमची स्मरणशक्ती बळकट होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात याच चॉकलेटच्या फायद्यांबद्दल आजच्या जागतिक चॉकलेट डे निमित्त…
Web Title: World chocolate day 2021 scientific health benefits of chocolate scsg