-
आज भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तिसरी पुण्यतिथी आहे.
-
२०१८ मध्ये १६ ऑगस्ट या दिवशी त्यांचे निधन झाले होते.
-
२५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हीर येथे जन्मलेले, अटल बिहारी वाजपेयी यांचे भारताच्या विकासासाठी योगदान नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहिल.
-
त्यांना चार दशकांचा दीर्घ संसदीय अनुभव होता आणि पंतप्रधान म्हणून त्यांचा वारसा समृद्ध आहे जो आजही स्मरणात राहतो.
-
२०१५ साली त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
-
जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेले अटलबिहारी वाजपेयी हे एकमेव नेते होते.
-
त्यांना केवळ राजकारणात रस न्हवता तर कवितेतही रस होता.
-
१९९९ मध्ये त्यांनी ज्येष्ठ गझल गायक जगजीत सिंग यांच्यासोबत 'नई दिशा' नावाचा अल्बम रिलीज केला. त्यात वाजपेयींनी त्यांच्या कविता कथन केल्या आणि सिंग यांनी त्या गायल्या होत्या.
-
उत्कृष्ट वक्ते असलेल्या वाजपेयींनी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हिंदीमध्ये भाषण दिले होते.
-
अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देऊन जाणार आहे (सर्व फोटो इंडियन एक्सप्रेस)
आज अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास
देश आज भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करत आहे
Web Title: Today atal bihari vajpayees death anniversary know his inspiring journey ttg