-
गुजरातमधील पहिले एयरक्राफ्ट (विमान) रेस्टॉरंट सोमवारी 25 ऑक्टोबर रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. वडोदरा शहरातील तरसाली बायपास येथे हे रेस्टॉरंट आहे.
-
हे रेस्टॉरंट जगातील नववे विमान थीम असलेले रेस्टॉरंट आहे. हे भारतातील चौथे रेस्टॉरंट आहे जे भंगार विमानाचा वापर करून बांधले गेले आहे.तर हे भारतातील पहिले एअरक्राफ्ट रेस्टॉरंट आहे.
-
हे रेस्टॉरंट तयार करण्यासाठी १.४० कोटी रुपये खर्चून बंगळुरूस्थित कंपनीकडून एअरबस ३२० खरेदी करण्यात आले होते.
-
विमानाचा प्रत्येक भाग वडोदरा येथे आणण्यात आला आणि रेस्टॉरंट म्हणून पुन्हा तयार करण्यात आला. सध्या त्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. त्याची क्षमता १०२ लोक बसण्याइतकी आहे.
-
यामध्ये तुमच्याकडे निवडण्यासाठी भरपूर खाद्य पर्याय असतील. रेस्टॉरंटमध्ये पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेंटल, इटालियन, मेक्सिकन आणि थाई पर्याय उपलब्ध आहेत.
-
रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला असे वाटेल की तुम्ही प्रत्यक्षात विमानातून प्रवास करत आहात, कारण वारंवार घोषणाही केल्या जातील. वेटर आणि सर्व्हर एअर होस्टेस आणि स्टीवर्डससारखे दिसतात. याच्या एन्ट्रीला एक टिकटही दिले जात आहेत.
Photos: भारतातलं पहिलं एअरक्राफ्ट रेस्टॉरंट आतून कसे दिसतं पाहिलं का?
हे रेस्टॉरंट २५ ऑक्टोबर रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष हवाई प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
Web Title: Photos worlds ninth aircraft restaurant in vadodara get real air travel experience ttg