Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. diwali moti soap ad vidyadhar karmarkar scsg

‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ सांगणाऱ्या ‘अलार्म काकां’च्या काही रंजक गोष्टी

दिवाळी आली की आवर्जून आठवणी जाहिरात म्हणजे मोती साबणाची जाहिरात. त्यातही हे काका म्हणजे अगदी घराघरात पोहचलेला चेहरा

November 3, 2021 17:43 IST
Follow Us
  • Diwali Moti Soap Ad vidyadhar karmarkar
    1/15

    दरवर्षी दिवाळी आली की आवर्जून आठवते ती जाहिरात म्हणजे मोती साबणाची जाहिरात.

  • 2/15

    ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ हे वाक्य आणि दिवाळी हे जसं काही समीकरणचं झालं आहे.

  • 3/15

    ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’, या जाहिरातीतून ‘अलार्म काका’ म्हणून घरोघरी पोहचलेले आजोबा महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये ओळखीचा चेहरा झालाय.

  • 4/15

    मात्र यंदाची दिवाळीला हे आजोबा आपल्या सोबत नाही.

  • 5/15

    मोती साबणाच्या जाहिरातीमध्ये दिसणारे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर याच वर्षी २१ सप्टेंबर रोजी निधन झाले.

  • 6/15

    वयाच्या ९६ व्या वर्षी विद्याधर करमरकर यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांत काम केले होते.

  • 7/15

    विलेपार्ले येथे राहणाऱ्या करमरकरांनी नोकरी सांभाळून आपल्या अभिनयाची आवड जोपासली होती.

  • 8/15

    ते जाहिरात आणि चित्रपटामध्येही अनेक छोट्य़ा छोट्या भूमिकांच्या माध्यमातून अभिनय करायचे.

  • 9/15

    ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘सास बहू और सेन्सेक्स’ आदी हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले होते.

  • 10/15

    याचबरोबर ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

  • वडिलांच्या किंवा आजोबांच्या छोटेखानी भूमिकांमधून ते अनेकदा समोर आले.
  • 11/15

    मराठी – हिंदी चित्रपटांबरोबरच ‘इंडियन ऑइल’, ‘पेप्सीगोल्ड’, ‘हेन्ज टोमॅटो केचप’च्या जाहिरातींमध्ये ते झळकले होते.

  • 12/15

    तसेच ‘लिनोवो कॉम्प्युटर्स’, ‘एशियन पेंट’ यासारख्या कंपन्यांच्या जाहिरातींतूनही त्यांनी काम केले होते.

  • 13/15

    मात्र त्यांची मोती साबणाची जाहिरात प्रचंड गाजली होती.

  • 14/15

    यापुढील प्रत्येक दिवाळीला ही जाहिरात दिसेल तेव्हा या आजोबांची आठवण नव्याने ताजी झाल्याशिवाय राहणार नाही. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंग आणि युट्यूबवरुन साभार)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi News

Web Title: Diwali moti soap ad vidyadhar karmarkar scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.