• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos and information of miss maharashtra contest winner pratibha sangle scsg

Photos: शेतकऱ्याच्या घरात जन्म, पोलिसात नोकरी ते Miss Maharashtra; जिंकल्यावर म्हणाली, “मी आव्हान करु इच्छिते की…”

पुरस्कार जिंकल्यानंतर तिने केलेलं वक्तव्य हे तिचं समाजभान सजग असल्याचं दाखवणारं आहे,

January 12, 2022 17:55 IST
Follow Us
  • pratibha sangle wins miss maharashtra contest
    1/28

    बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावलाय.

  • 2/28

    एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी आपल्या सौंदर्याने परिक्षकांना भुरळ पाडत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय.

  • 3/28

    कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा प्रतिभा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. याच प्रवासावर टाकलेली ही नजर…

  • 4/28

    बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.

  • 5/28

    पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकावलाय हे विशेष.

  • 6/28

    प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील आहेत.

  • 7/28

    प्रतिभा या २०१० सालापासून बीडच्या पोलीस दलात कार्यरत आहेत.

  • 8/28

    सध्या प्रतिभा या बीडच्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत.

  • 9/28

    प्रतिभा या महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

  • 10/28

    प्रतिभा यांना मागील अनेक वर्षांपासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती.

  • 11/28

    प्रतिभा या त्यांची इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बराच प्रयत्न करत होत्या.

  • 12/28

    अखेर प्रतिभा मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीस पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या.

  • 13/28

    या स्पर्धेमध्ये त्यांनी फर्स्ट रनर अप होऊन मिस महाराष्ट्र स्पर्धेपर्यंत मजल मारली.

  • 14/28

    मिस महाराष्ट्र स्पर्धेमध्ये प्रतिभा यांनी जेतेपद पटकावलं आहे.

  • 15/28

    केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही गाजवले आहे.

  • 16/28

    यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून प्रतिभा यांनी आपली तयारी पुढे सुरू ठेवलीय.

  • 17/28

    “माझे आजोबा कुस्तीपटू होते. त्यांच्याकडून पाहून मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी कुस्तीच्या रिंगणात उतरले. मी पोलीस दलामध्ये खेळाडू म्हणून जॉइन झाले,” असं प्रतिभा सांगतात.

  • 18/28

    “लहानपणी शाळा, गॅदरींगमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे तेव्हाचे जे छंद होते ते आता जोपासले पाहिजे असं वाटलं. त्यातूनच सौंदर्य स्पर्धेकडे मी वळले,” असं प्रतिभा यांनी म्हटलं आहे.

  • 19/28

    “बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. येथे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण फारच कमी आहे. मी पालकांना आवाहन करु इच्छिते की मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं लग्न करु नका,” असंही प्रतिभा यांनी म्हटलं आहे.

  • 20/28

    तसेच मुलींचा बालविवाह केला जाऊ नये यासाठी आपण जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

  • 21/28

    प्रतिभा या सोशल मीडियावर सक्रीय आहेत.

  • 22/28

    अनेकदा त्या आपल्या फॉलोअर्ससाठी सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत असतात.

  • 23/28

    अगदी साडीसारख्या पारंपारिक पेहरावापासून ते मॉडर्न पेहरावापर्यंत अनेक वेगवगेळ्या फोटोशूटमधील फोटो त्या शेअर करताना दिसतात.

  • 24/28

    अनेक वर्षांपासून नोकरी आणि आपली आवड जोपासणाऱ्या प्रतिभा या विजयामुळे पुन्हा चर्चेत आल्यात.

  • 25/28

    आता प्रतिभा यांचा आत्मविश्वास या विजयामुळे वाढला असून अशीच वाटचाल भविष्यात सुरु ठेवण्याचा त्यांनी निश्चय केलाय.

  • 26/28

    सर्वच स्तरामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

  • 27/28

    पोलीस दल, कुस्ती आणि मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सांगळे यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी आदर्श घालून दिलाय.

  • 28/28

    या यशानंतर पोलीस दलासह बीड जिल्ह्यात प्रतिभा सांगळे यांचं कौतुक होतंय.

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos and information of miss maharashtra contest winner pratibha sangle scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.