• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. the five biggest ipl one season wonders adn

PHOTOS : आज क्रिकेटविश्वातून गायब झालेले, पण एकेकाळी IPL गाजवलेले ५ खेळाडू!

February 4, 2022 18:34 IST
Follow Us
  • मनविंदर बिस्ला - आयपीएल २०१२च्या फायनलमध्ये ८९ धावा करणाऱ्या मनविंदर बिस्लाने कोलकाता नाइट रायडर्स संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर २०१५ मध्ये आरसीबीने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले, परंतु या स्पर्धेत त्याने विशेष प्रभाव पाडला नाही. बिस्लाने त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत ३९ सामन्यांत ७९८ धावा केल्या आहेत.
    1/5

    मनविंदर बिस्ला – आयपीएल २०१२च्या फायनलमध्ये ८९ धावा करणाऱ्या मनविंदर बिस्लाने कोलकाता नाइट रायडर्स संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर २०१५ मध्ये आरसीबीने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले, परंतु या स्पर्धेत त्याने विशेष प्रभाव पाडला नाही. बिस्लाने त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत ३९ सामन्यांत ७९८ धावा केल्या आहेत.

  • 2/5

    कामरान खान – आयपीएल २००९ मध्ये, राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज कामरान खान आपल्या वेगळ्या अ‍ॅक्शनने खूप चर्चेत आला. या मोसमात त्याने ९ सामने खेळले आणि ९ विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर त्याची कारकीर्द संपुष्टात आली.

  • 3/5

    पॉल वल्थाटी – आयपीएल २०११ मध्ये आपल्या वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध झालेला पॉल वल्थाटी आज कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. पण आयपीएलच्या चौथ्या पर्वात त्याने पंजाबसाठी खोऱ्याने धावा काढल्या. २०११ मध्येच त्याने चेन्नईविरुद्ध विरुद्ध ६३ चेंडूत १२० धावांची शानदार नाबाद खेळी खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

  • 4/5

    राहुल शर्मा – राहुल शर्माने २०११च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. फिरकी गोलंदाज राहुल शर्मा आयपीएलमध्ये भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरची विकेट घेऊन चर्चेत आला. आयपीएल २०११ मध्ये त्याने ३ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातही स्थान मिळाले. २०१२मध्ये ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली त्याच्या करिअरचा आलेख घसरत राहिला. त्याने टीम इंडियासाठी चार एकदिवसीय आणि दोन टी-20 सामनेही खेळले आहेत.

  • 5/5

    स्वप्नील अस्नोडकर – आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी ग्रॅमी स्मिथसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या स्वप्नील अस्नोडकरचा संघाला चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा होता. पण या मोसमानंतर पुढच्या मोसमात त्याला फारशी कामगिरी करता आली नाही आणि तो संघाबाहेर गेला. अस्नोडकरने शेवटचा सामना २०११ मध्ये पंजाब किंग्ज (तत्कालीन किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये २० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४२३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. आज स्वप्नील क्रिकेटच्या दुनियेतून गायब झाला आहे.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: The five biggest ipl one season wonders adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.