• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mosque loudspeakers in bjp ruled states scsg

Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…

राज ठाकरेंनी केलेल्या भोंगे काढण्याच्या मागणीला महाराष्ट्र भाजपाने पाठिंबा दिलाय पण…

April 5, 2022 19:51 IST
Follow Us
  • mosque loudspeakers in bjp ruled states
    1/25

    मशिदींवरील भोंगे उतरविण्याची मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली असता भाजपा नेत्यांनी त्याला सहमती दर्शविली आहे.

  • 2/25

    असं असलं तरी भाजपाची सत्ता असलेल्या गुजरात, उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये मशिदींवरील भोंगे कायम आहेत.

  • 3/25

    मशिदींवरील भोंगे हटविण्याचा निर्णय कोणत्याही भाजपाशासित राज्यांमध्ये झालेला नाही.

  • 4/25

    उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गोवा, ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर , त्रिपुरा आदी एकूण १८ राज्यांमध्ये भाजपा थेट किंवा युती करुन सत्तेत आहे.

  • 5/25

    भाजपाशासित राज्यांमध्ये कोठेही आजान किंवा मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा निर्णय झालेला नाही.

  • 6/25

    उत्तर प्रदेशात भाजपा सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत मशिदींवरील भोग्यांवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.

  • 7/25

    तेव्हा भाजपाच्या काही मंत्र्यांनी बंदीचा विचार करण्यात येत असल्याचे सूतोवाच केले होते.

  • 8/25

    पण योगी आदित्यनाथ सरकारने आजान किंवा भोंग्यावर अद्याप तरी बंदी घातलेली नाही.

  • पंतप्रधान मोदींच गृहराज्य असणाऱ्या गुजरात राज्यातही अशा प्रकारची बंदी नाही.
  • 9/25

    अलीकडेच फेब्रुवारीमध्ये गांधीनगरमधील एका नागरिकाने मशिदींवरील भोंग्यांवर बदी घालावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली असता, उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला भूमिका मांडण्यासाठी नोटीस बजाविली आहे.

  • 10/25

    हिजाब, हलाल मटण यावरून कर्नाटकात सध्या वातावरण तापले असता राज ठाकरे यांच्या मागणीनंतर कर्नाटकात काही उजव्या संघटनांनी अजानवर बंदीची मागणी केली.

  • 11/25

    मात्र, मुस्लीम समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे कर्नाटकमधील भाजपाचे मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी सोमवारीच स्पष्ट केले.

  • 12/25

    सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपक वाजविण्याबाबत स्पष्ट आदेश दिला आहे.

  • 13/25

    त्यात भोंग्यावर बंदीचा समावेश नाही याकडे लक्ष वेधण्यात येते.

  • 14/25

    राज्यात भाजपा आग्रही > राज ठाकरे यांच्या मागणीनंतर मशिदींवरील भोंग्यांना भाजपा, मनसे आणि सत्ताधारी शिवसेनेचाही विरोध असल्याने राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

  • 15/25

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून अजान व नमाज अदा केली जात असेल, तेथे हनुमान चालीसा मोठय़ा आवाजात लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

  • 16/25

    तर भाजपाशासित किती राज्यांमध्ये मशिदींवरील भोंगे काढण्यात आले, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

  • 17/25

    त्याला प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अन्य भाजपाशासित राज्यांची उदाहरणे देऊ नयेत, असं म्हटलंय.

  • 18/25

    त्या राज्यांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना किती सोयी सवलती दिल्या, आपत्तीकाळात किती आर्थिक मदत दिली, पेट्रोल-डिझेलवरचा कर किती कमी केला व जनतेला दिलासा दिला, यासह अन्य बाबींची तुलना केली जाते का, असा सवाल मुनगंटीवार यांनी केलाय.

  • 19/25

    राज्यघटनेनुसार प्रत्येकाला धार्मिक बाबी, पूजा-अर्चा, नमाज यांचे अधिकार आहेत. पण ते करताना इतरांना त्रास होऊ नये, हीच अपेक्षा आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

  • 20/25

    भाजपचे नेते मोहित कंबोज, प्रसाद लाड यासारखे मुंबईमध्ये नेते या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. ते सोशल मीडियाबरोबरच प्रसारमाध्यमांवरुन या विषयावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधतानाचे चित्र दिसत आहे.

  • 21/25

    भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसहीत महाराष्ट्रभरातील लाऊडस्पीकरवरील अजान बंद झाले पाहिजेत अशी पक्षाची भूमिका असल्याचं म्हटलं आहे. जुन्या काळामध्ये वेळ कळण्यासाठी अजानचा वापर केला जायचा. पण आज सगळ्यांकडे घड्याळं, मोबाईल आहेत त्यामुळे आता अजानची गरज नाही अशी भूमिका लाड यांनी मांडली आहे.

  • 22/25

    “दिवसातून पाच वेळा अजानचा भोंगा वाजतो. त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा विरोध आहे. आम्ही मुंबईतील, महाराष्ट्रातील कार्यकर्ते म्हणून हे सांगू इच्छितो, आम्ही धर्माला विरोध करत नाहीय. पण धर्माच्या माध्यमातून ज्यापद्धतीने धर्म बळकावण्याचा काम करतायत त्याला आमचा विरोध आहे. पूर्वीच्या काळी अजान याच्यासाठी वापरला जायचा की पाच वेळा नमाज पडत असताना वेळ कळावी. लोकांनी झोपेतून उठावं नमाझ पठण करावं यासाठी अजानचा आधार घेतला जायचा,” असं लाड यांनी अजानसंदर्भात बोलताना म्हटलं.

  • 23/25

    सध्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना, “त्या काळात लोकांकडे घड्याळं नव्हती. आज घड्याळं आहेत, मोबाईल फोन्स आहेत. भिंतीवर घड्याळं आहेत. सरकारमध्ये देखील घड्याळ आहे. त्यामुळे आज त्या अजानची गरज नाहीय,” असं लाड म्हणाले.

  • 24/25

    “महाराष्ट्रात दिवाळीला विरोध, गणपतीला विरोध, होळीला विरोध, गुडीपाडव्याच्या मिरवणुकीला विरोध, रामनवमीला विरोध मग अजानला विरोध का नाही? त्यामुळे या मुंबईतील, महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि हे आम्ही बंद करुन राहणार,” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमुस्लीमMuslim

Web Title: Mosque loudspeakers in bjp ruled states scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.