• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. interesting facts about mp navneet rana scsg

नवनीत राणा : मनोरंजन ते राजकारण… बोल्ड अभिनेत्री ते रोखठोक भूमिका मांडणाऱ्या नेत्या; वडील होते लष्करी अधिकारी तर आई…

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक म्हणजे खासदार नवनीत राणा

April 26, 2022 20:24 IST
Follow Us
  • interesting facts about mp navneet rana
    1/27

    महाराष्ट्रामधील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पत्नी रावी राणा सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

  • 2/27

    मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणामध्ये त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

  • 3/27

    शनिवारी नवनीत राणा आणि त्यांच्या पतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिल्यानंतर मुंबईमधील वातावरण चांगलेच तापले होते.

  • 4/27

    या प्रकरणात राणा दांपत्याला अटक करुन त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलाय.

  • 5/27

    शिवसेना विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष संपूर्ण देशामधील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला. शिवसैनिकांनी खारमधील राणा दांपत्याच्या घराखाली गोळा होऊन घोषणाबाजीही केली.

  • 6/27

    सध्या राणा दांपत्य तुरुंगामध्ये असून त्यांना न्यायालयानेही फटकारले आहे.

  • 7/27

    याच राणा दांपत्यापैकी नवनीत राणा यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी या गॅलरीमधून जाणून घेऊयात

  • 8/27

    राजकारणामध्ये येण्याआधी नवनीत कौर या तेलगू चित्रपटांमध्ये काम करायच्या.

  • 9/27

    नवनीत यांनी तमिळ आणि तेलगू अशा एकूण २० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय.

  • 10/27

    नवनीत या मूळच्या पंजाबच्या आहेत.

  • 11/27

    मनोरंजन सृष्टीमध्ये त्यांचा कोणीच गॉड फादर नव्हता.

  • 12/27

    त्यांनी आधी एक अभिनेत्री म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्वत:ची ओळख स्वत: निर्माण केली आणि नंतर त्या राजकारणामध्ये आल्या.

  • 13/27

    चेतना : द एक्सपिरिमेंट या चित्रपटामधून नवनीत यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं.

  • 14/27

    बोल्ड इमेज असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नवनीत राणा कौर यांचं नाव घेतलं जायचं.

  • 15/27

    २०११ मध्ये सामूहिक विवाह कार्यक्रमात त्यांनी राजकारणी असणाऱ्या रवी राणासोबत लग्न केले.

  • 16/27

    योग शिबिरात जात असताना त्यांची भेट राजकारणी रवी राणा यांच्याशी झाली.

  • 17/27

    रवी राणासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे राजकारणात प्रवेश केला

  • 18/27

    २०१४ साली मनोरंजन क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर त्या कायमच सार्वजनिक जीवनामध्ये पारंपरिक भारतीय पेहरावत दिसून येतात.

  • 19/27

    नवनीत या फिट राहण्याला फार महत्व देतात. त्या नित्यनियमाने योगाचा सराव करतात.

  • 20/27

    पहिल्यांदा आई झाल्यानंतर आणि अभिनय क्षेत्रामधून बाहेर पडल्यानंतरही नवनीत यांनी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं.

  • 21/27

    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली.

  • 22/27

    त्यावेळी त्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात पराभूत झाल्या होत्या. याच निवडणुकीपासून त्यांचे शिवसेनेसोबतचे वैर सुरू झाले.

  • 23/27

    यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आणि विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

  • 24/27

    नवनीत राणा यांचा विजय हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी मोठा धक्का होता.

  • 25/27

    नवनीत यांचे वडील लष्करी अधिकारी होते

  • 26/27

    नवनीत यांची आई गृहिणी होती.

  • 27/27

    एकेकाळी नवनीत या अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर झळकायच्या आता त्या संसदेमध्ये तितक्याच उत्तम पद्धतीने आपल्या मतदारसंघामधील प्रश्न मांडताना दिसतात.

TOPICS
नवनीत राणाNavneet Ranaरवी राणाRavi Rana

Web Title: Interesting facts about mp navneet rana scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.