• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. meet gujarat vadodara city kshama bindu bisexual india first woman self marriage sologamy ritual detailed information photos sdn

Photos: स्वत:शीच लग्नबंधनात अडकणारी क्षमा बिंदू आहे तरी कोण अन् ‘सेल्फ मॅरेज’मध्ये नक्की काय होणार?

Self-Marriage : एका मंदिरात क्षमा स्वत:सोबतच लग्न करणार आहे. लग्नानंतर ती दोन आठवडे हनिमूनसाठी गोव्याला जाणार आहे.

June 4, 2022 14:55 IST
Follow Us
  • Kshama Bindu, what is sologamy, self-marriage or sologamy
    1/27

    गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या २४ वर्षीय क्षमा बिंदू नावाच्या तरुणीने गुरुवारी (२ जून २०२२ रोजी) जाहीर केलं की ती या महिन्यात स्वत:शीच लग्न करणार आहे.

  • 2/27

    हे लग्न म्हणजे स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देण्याचं प्रतिक असेल असंही तिने सांगितलं.

  • 3/27

    यापूर्वी जगातील वेगवगेळ्या देशांमध्ये अशाप्रकारची लग्नं झाली आहेत.

  • 4/27

    मात्र भारतामध्ये अशाप्रकारे स्वत:शीच एखाद्या व्यक्तीने लग्न करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • 5/27

    हे लग्न ११ जून रोजी होणार असून अशा लग्नांना सोलोगॅमी असं म्हणतात.

  • 6/27

    सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वत:शीच लग्न करण्याच्या पद्धतीने सोलोगॅमी म्हणतात.

  • 7/27

    यालाच दुसरं नाव सेल्फ मॅरेज किंवा ऑटोगमी असं आहे.

  • 8/27

    अशा लग्नांना कायदेशीर दृष्ट्या कोणत्याही प्रकारची मान्यता नसते.

  • 9/27

    मात्र या लग्नांचा एक प्रातिनिधिक सोहळा आयोजित केला जातो.

  • 10/27

    अनेकदा अशापद्धतीने लग्न करणारे आमचं स्वत:वर प्रेम असून त्यासाठी आम्ही हे करतोय असं सांगतात.

  • 11/27

    अनेकजण या अशा लग्नांच्या माध्यमातून स्वातंत्र्याची जाणीव होते असंही सांगतात.

  • 12/27

    अशाप्रकारे स्वत:शीच लग्न करण्याचा प्रकार सर्वात आधी अमेरिकेमधील लिंडा बाकेर या तरुणीने केला होता.

  • 13/27

    पेशाने दंतचिकित्सक असणाऱ्या लिंडाने १९९३ मध्ये स्वत:शीच लग्न केलं होतं.

  • 14/27

    अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वत:शीच लग्न करणारी लिंडा ही पहिलीच व्यक्ती होती.

  • 15/27

    लिंडाच्या लग्नाला कुटुंबिक मित्रांसहीत एकूण ७५ जण उपस्थित होते.

  • 16/27

    या लग्नांना असे काही विशिष्ट नियम नाहीत किंवा समाजमान्य प्रथाही नाहीत.

  • 17/27

    दोन व्यक्तींचं लग्न होतं त्याप्रमाणे पारंपारिक पद्धतीने कोणत्याही धार्मिक रितीरिवाजानुसारही हे कार्यक्रम पार पडतात.

  • 18/27

    सध्या अशाप्रकारे लग्न करणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने लग्नांसंदर्भात सेवा पुरवणाऱ्यांकडूनही या लग्नांविषयी वेगवेळ्या संकल्पना राबवल्या जात आहेत.

  • 19/27

    स्वत:शी केलं जाणारं लग्न हे सर्वसामान्य लग्नाइतकच अविस्मरणीय व्हावं यासाठी काही लग्न नियोजन (वेडिंग प्लॅनर) कंपन्यांनी सेवा पुरवण्यास सुरुवात केलीय.

  • 20/27

    क्षमा गुजरातमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहे.

  • 21/27

    “आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत आपण लग्न करतो. पण माझं स्वत:वर प्रेम आहे म्हणून मी स्वत:सोबत लग्न करणार आहे”, असं क्षमा म्हणाली.

  • 22/27

    “हे लग्न म्हणजे कोणत्याही अटीशिवाय स्वत:वर कसं प्रेम करायचं याचं उदाहरण असेल. समाज याबद्दल काय म्हणायचं ते म्हणेल,” असं सांगतानाच क्षमा आपल्या पालकांचा या निर्णयाला पाठिंबा असल्याचंही सांगते.

  • 23/27

    एका मंदिरात क्षमा स्वत:सोबतच लग्न करणार आहे.

  • 24/27

    लग्नानंतर ती दोन आठवडे हनिमूनसाठी गोव्याला जाणार आहे.

  • 25/27

    अशापद्धतीने स्वत:शीच लग्न करण्याच्या संकल्पनेला अनेक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये स्थान मिळालं आहे.

  • 26/27

    यामध्ये सेक्स अ‍ॅण्ड द सिटी, ग्ली आणि डॉक्टर हू यासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

  • 27/27

    (सर्व फोटो सौजन्य : क्षमा बिंदू / इन्स्टाग्राम)

TOPICS
गुजरातGujaratट्रेंडिंग न्यूजTrending NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Meet gujarat vadodara city kshama bindu bisexual india first woman self marriage sologamy ritual detailed information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.