• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pune metro tunnel boring machine completes 12 km distance scsg

Photos: नाही.. नाही.. हॉलिवूड चित्रपटातील दृष्यं नाहीत… हे फोटो पुण्यातले आहेत; फोटो पाहून पुणेकरही म्हणतील, “मानलं बुवा”

पुणेकरांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास “पुण्यात आज काहीतरी फार भन्नाट घडलंय अन् ते फार अभिमानास्पद आहे.”

June 4, 2022 19:38 IST
Follow Us
  • Pune Metro tunnel boring machine
    1/12

    पुणे मेट्रो प्रकल्पअंतर्गत भूमिगत मेट्रो मार्गिकेच्या बारा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. (फोटो : आशिष काळे)

  • 2/12

    पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

  • 3/12

    भुयारी मार्गातील अत्यंत आव्हानात्मक टप्पा नियोजित वेळेत पूर्ण झाल्याचं जंगी सेलिब्रेशनही कर्मचाऱ्यांनी केलंय.

  • 4/12

    स्वारगेट येथून निघालेले पवना टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) भुयारी मार्ग पूर्ण करून बुधवार पेठ स्थानकात बाहेर पडले.

  • 5/12

    पवना टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) पेठ स्थानकाजवळ बाहेर पडले तो क्षण एखाद्या हॉलिवूडमधील चित्रपटाप्रमाणे भासावा असा होता.

  • 6/12

    या टीबीएमद्वारे भुयारी मार्गाचे एकूण १२ किमीचे काम पूर्ण झले आहे.

  • 7/12

    उर्वरित भूयारी मार्गात आता इतर काम पूर्ण केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.

  • 8/12

    यामध्ये प्रामुख्याने सिग्नलिंग यंत्रणा, मेट्रोचे रूळांचे काम केलं जाणार आहे.

  • 9/12

    तसेच विद्युत व्यवस्था व इतर महत्वपूर्ण व्यवस्था बसवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.

  • 10/12

    १२ किलोमीटरच्या या बोगद्याचं काम पूर्ण झाल्याचा आनंद कामगारांनी उत्साहात साजरा केला.

  • 11/12

    बोरिंग मशिनसमोर तिरंगा धरुन कामगारांनी अनेक फोटो काढले.

  • 12/12

    हे अवघड काम अगदी वेळेत पूर्ण झाल्याचा आनंद कामगारांच्या आणि तंत्रज्ञांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. अगदी वेळेत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कष्ट आणि त्यांनी केलेला जल्लोष पाहून पुणेकर नक्कीच ‘मानलं बुवा’ म्हणत त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देतील यात शंका नाही.

TOPICS
पुणेPuneपुणे न्यूजPune Newsपुणे मेट्रोPune Metro

Web Title: Pune metro tunnel boring machine completes 12 km distance scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.