scorecardresearch

पुणे मेट्रो

मुंबईप्रमाणे पुणे शहरामध्येही वेगाने प्रगती होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये असंख्य उद्योगधंदे सुरु झाले आहेत. विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये आयटी पार्क्स पाहायला मिळत आहेत. करीअरची संधी मिळत असल्याने लोक पुण्यात स्थलांतरीत होत आहेत. फार पूर्वीपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसह पुण्यामध्ये नोकरदार वर्गाचेही प्रमाण वाढत चालले आहे. याचा परिणाम पुण्यातील वाहतूकीवर होत असल्याचे पाहायला मिळते. मागील दोन दशकांमध्ये ही समस्या अधिक भीषण झाली आहे. यावर उपाय म्हणून २००६ मध्ये बीआरटीची सुरुवात करण्यात आली. पण त्याला अपयश आले. याच सुमारास मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली होती. यावरुन पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा पर्याय समोर सादर करण्यात आला. २०१२ मध्ये याला राज्य सरकारची संमती मिळाली. २४ डिसेंबर २०१६ रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महामेट्रोचे भूमिपूजन केले गेले. सध्या या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सेवा उपलब्ध आहेत. मार्च २०२२ मध्ये ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली. महामेट्रो प्रकल्पामध्ये आणखी ३ मार्गिका जोडण्यात येणार आहेत.Read More
complete Pune Metro work by 2025
पुणेरी मेट्रोचे काम २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान

हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) केंद्राला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रो प्रकल्पाच्या कामाने वेग पकडला आहे.

pune metro
पुण्यात मेट्रो मार्गांचा तिढा! पीएमआरडीए, महामेट्रोची समान मार्गांकडे धाव

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आणि महामेट्रो यांच्याकडून दोन समान मार्गांवर मेट्रो उभारणीचे प्रकल्प विकास आराखडे सादर करण्यात आले…

metro during Ganeshotsav
पुणे: गणेशभक्तांनी खुशखबर! गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या वेळेत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे आणि विसर्जनाच्या दिवशी मेट्रो रात्री २ पर्यंत चालू असणार आहे.

construction pillars route Puneri Metro final stage pune
‘पुणेरी मेट्रो’ला वेग! कामे अंतिम टप्प्यात; ८० टक्के खांबाची उभारणी पूर्ण

या २३.३ किलोमीटर मार्गावरील एकूण ९२३ खांबांपैकी ७१५ खांबांची म्हणजेच ८० टक्के उभारणी आता पूर्ण झाली आहे.

pune metro card
कार्ड घ्या अन् मेट्रोतून बिनधास्त प्रवास करा! ‘एक पुणे कार्ड’ला प्रवाशांची पसंती

मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महामेट्रोने ‘एक पुणे कार्ड’ हे प्रीपेड कार्ड सुरू केले असून, ते बहुउद्देशीय आहे.

man traveled in Pune metro with a bicycle
चक्क सायकल घेऊन तरुणाने केला पुणे मेट्रोमध्ये प्रवास, व्हायरल होतोय व्हिडीओ

सध्या पुण्याची मेट्रो चर्चेत आली आहे. कारण एक पुणे मेट्रोमध्ये एक तरुणाने चक्क सायकल घेऊन प्रवास केला आहे. हा व्हिडीओ…

pune metro
पुणे मेट्रोचा घोळ! कामाच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह

पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असतानाच पावसामुळे मेट्रो स्थानके गळू लागल्याचे विदारक चित्र समोर आले.

pune metro
पुणे: मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला गती; प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे

मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील चार विस्तारित मेट्रो मार्गिकांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) मंजुरीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला…

Apurva Alatkar
गोष्ट असामान्यांची Video: पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला, अपूर्वा अलाटकरला ‘अशी’ मिळाली संधी

मेट्रो चालवणं जमेल की नाही याची कुटुंबातील सर्वांना चिंता होती, पण…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×